crime news  esakal
मुंबई

Mumbai : चित्रपट सुटताच, चित्रपटगृहाच्या दारात पतीचे फोडलं डोक...

कल्याण मध्ये पठाण चित्रपट वेगळ्याच कारणामुळे गाजला आहे.

सकाळ वृत्तसेवा

कल्याण : पठाण चित्रपट सद्या खूप गाजत आहेत. मात्र हा चित्रपट कल्याण मध्ये वेगळ्याच प्रकरणामुळे गाजला आहे. 'पठाण' चित्रपट बघण्यासाठी गेलेल्या पती आणि पत्नीला शुल्लक कारणावरून वाद घालत एकाच कुटूंबातील व्यक्तीनी मिळून चित्रपट गृहाच्या दरवाजात पतीला जबर मारहाण केल्याची घटना कल्याण मध्ये घडली आहे.

ही घटना कल्याण पश्चिम भागातील सर्वेद्य मॉल मधील चित्रपट गृहाच्या दारातच घडली आहे.याप्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात हल्लेखोर कुटूंबावर भादंवि मधील विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रभाकर म्हात्रे , दुर्वेश म्हात्रे, प्रसाद म्हात्रे, आणि त्यांच्या सोबत असलेल्या तीन महिला असे गुन्हा दाखल झालेल्या हल्लेखोर कुटूंबाचे नाव आहे. तर नदीम आदाम हुनेरकर वय ३०) असे गंभीर जखमीचे नाव आहे.

पठाण चित्रपट सद्या खूप गाजत आहेत. मात्र हा चित्रपट कल्याण मध्ये वेगळ्याच प्रकरणामुळे गाजला आहे.सूत्राने दिलेल्या माहितीनुसार कल्याण पश्चिम भागातील बैलबाजार परिसरात असलेल्या सर्वेद्य मॉल पठाण चित्रपट शो चालु आहे.

हा चित्रपट पाहण्यासाठी हुनेरकर दांपत्य ३० जानेवारी आले होते. रात्रीच्या सुमारास चित्रपट सुटण्याआधी हल्लेखोर मधील एकाने जखमी नदीम यांच्या पत्नीस क्या चायना डुप्लीकेट माल लाया है, असे बोलताच पत्नीने वाद घालताच हल्लेखोर कुटूंबाने पत्नी व पतीला चित्रपट गृहात मारहाण केली.तर कुटूंबाच्या मारहाणीमुळे पती पत्नी घाबरून लिफ्टने चित्रपट गृहाच्या मुख्य प्रवेश दारात येताच, हल्लेखोर म्हात्रे कुटूंबानी पुन्हा गाठले आणि पतीवर लोखंडी रॉड व पेव्हर ब्लॉक डोक्यात मारून गंभीर दुखापत केली.

त्यानंतर चित्रपट गृहातील सुरक्षा रक्षकानी मध्यस्थी केल्याने हल्लेखोरानी पती व पत्नीला मारहाण करणे थांबले होते.दरम्यान, पतीवर एका खाजगी रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यानंतर ३१ जानेवारीच्या मध्यरात्रीच्या सुमारास हल्लेखोर म्हात्रे कुटूंबावर भादंवि कलम ३२६, २२३, ५०४, १४३, १४७, १४१, प्रमाणे गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा अधिक तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक देविदास ढोले करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT