BJP-MLA-Ram-Kadam
BJP-MLA-Ram-Kadam 
मुंबई

'लसीच्या नावाखाली कांदिवलीतील रहिवाशांच्या शरीरात काय गेलं?'

कृष्णा जोशी, रामनाथ दवणे, मुंबई

मुंबई: खासगी रुग्णालयांमार्फत खासगी सोसायट्यांमध्ये (Kandivali housing society) होत असलेल्या लसीकरण मोहिमेत मोठा गोंधळ झाल्याचा प्रकार कांदिवलीच्या एका सोसायटीत उघड झाला आहे. या रहिवाशांना भलत्याच रुग्णालयांची व वेगळ्याच तारखेची लसीकरण (vaccination) प्रमाणपत्रे मिळाली आहेत. त्यामुळे अशा मोहिमांमार्फत अतीव सावधगिरी बाळगायला हवी, असे आवाहन केले जात आहे. (Mumbai Kandivali Residents of housing society allege vaccination scam ram kadam slam thackeray govt )

याच मुद्यावरुन घाटकोपरमधील भाजपा आमदार राम कदम यांना ठाकरे सरकारला जाब विचारला आहे. "मुंबईतील एका मोठ्या सोसायटीत काही लोक जाऊन सांगतात, आम्ही हॉस्पिटलमधुन आलोय. सोसायटीतील शेकडो लोकांना बोगस कोरोना लस दिली जाते अशी तक्रार त्या सोसायटीतील नागरिकांची आहे. लसीच्या नावाखाली नेमक त्या लोकांच्या शरीरात काय गेलय, त्याचे काय दुष्परिणाम होणार ते परमेश्वर जाणे. पण मंबई आणि महाराष्ट्रात अशा प्रकारच्या दुर्देवी घटना या तीन पक्षाच्या वसुली सरकारच्या कालखंडात घडत आहेत.

"हे सरकार कोणत्या कुंभकर्णाच्या झोपेत आहे. एवढी मोठी घटना घडत असताना, तुमचं प्रशासन काय करत होतं. मागच्या दीड वर्षांपासून मुंबई पवित्र महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्या अनेक घटना या भूमीत घडल्या आहेत. आता लोकांच्या जीवाशी लोक खेळतायत, तीन पक्षाच सरकार करतय काय?" असा सवाल राम कदम यांनी विचारला आहे.

नेमकं काय घडलं?

कांदिवलीच्या हिरानंदानी हेरिटेज सोसायटीमधील रहिवाशांचे कोकिळाबेन रुग्णालयाचे प्रतिनिधी (एजंट) म्हणवणाऱ्या व्यक्तींमार्फत 30 मे रोजी लसीकरण झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र लस घेतलेल्यांना नानावटी, लाईफलाईन रुग्णालयांची प्रमाणपत्रे आली. तसेच सशुल्क लसीकरण होऊनही निःशुल्क सेवा असलेल्या नेस्को लसीकरण केंद्राची प्रमाणपत्रेही काहीजणांना आली. या प्रमाणपत्रांवर तारखाही भलत्याच होत्या, तसेच लस घेतलेल्यांपैकी कोणालाही त्याची ताप, अंगदुखी आदी लक्षणेही जाणवली नाहीत. त्यामुळे या लशींच्या खरेपणाबद्दलही रहिवाशांना शंका येत आहेत. प्रत्यक्षात आपण ही लसीकरण मोहिम राबविल्याचा कोकिळाबेन रुग्णालयाने सकाळ कडे इन्कार केला आहे. या प्रकरणात दोन जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

या रुग्णालयाचा प्रतिनिधी म्हणविणाऱ्या पांडे यांच्यामार्फत 30 मे रोजी सोसायटीला कोव्हिशिल्डचे चारशे डोस पुरविण्याचे ठरले. त्यानुसार प्रिस्टिना, एस्टोनिया व रीव्होना या तीन इमारतींमधील 390 रहिवासी, नातलग, कर्मचारी, वाहनचालक आदींचे लसीकरण झाले. त्याचे पैसेही अन्य व्यक्तीला देण्यात आले. मात्र नंतर नागरिकांना भलत्याच रुग्णालयांची व वेगळ्याच तारखांची लसीकरण झाल्याची प्रमाणपत्रे आली. कोविन अॅप वर यापैकी कित्येकांची पहिला डोस झाला अशी नोंद झाली नाही. कोणालाही लस घेतल्यानंतर ताप, अंगदुखी आदी लक्षणे न जाणवल्याने आता हे प्रकार पाहून त्यांना लशीच्या खरेपणाबद्दलही शंका येऊ लागली आहे. यासंदर्भात रहिवाशांनी कांदिवली पोलिस ठाण्यात तसेच स्थानिक भाजप आमदार योगेश सागर यांच्याकडेही तक्रार केली आहे.

सागर यांनीही याप्रकरणी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना लक्ष घालण्याची विनंती केली आहे. अशा स्थितीत खासगी रुग्णालयांमार्फत होणाऱ्या लसीकरण मोहिमांबाबत लोकांनी व्यवस्थित खातरजमा करावी. पैसे दिल्याच्या पावत्या, कोविन अॅप वरील नोंदी यांचे पुरावे तपासावेत, रुग्णालयाच्या वैध प्रतिनिधीशी संपर्क साधावा, असे आवाहनही सागर यांनी केले आहे.

तर ही लसीकरण मोहीम कोकिळाबेन रुग्णालयातर्फे आयोजित करण्यात आली नव्हती, आम्हाला या सोसायटीकडून कोणीही संपर्क साधला नव्हता, आमचे कोणीही एजंट नाहीत असे रुग्णालयाचे सीईओ संतोष शेट्टी यांनी सकाळला सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT