गुंड  sakal
मुंबई

Mumbai : हातात पिस्तुल घेऊन परिसरात फिरत असतानाच ; दुसऱ्या हातात पडल्या पोलिसांच्या बेड्या

कोळसेवाडी पोलिसांनी पिस्तुलधारी गुंड मन्या यादवला केली अटक

शर्मिला वाळुंज : सकाळ वृत्तसेवा

डोंबिवली : आषाढी एकादशी आणि ईद सणाच्या पार्श्वभूमीवर शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कल्याण परिमंडळ 3 मधील सर्व पोलीस ठाण्यातील पोलीस सतर्क होते. दुर्गाडी किल्ला येथे मुस्लिम बांधव नमाज पढत असतानाच किल्ल्याच्या पायथ्याशी हिंदु समाज घंटानाद आंदोलन करत होता.

सेनेच्या या आंदोलनामुळे शहरात काही काळ तणावाचे वातावरण असतानाच कोळसेवाडी पोलिसांना गुंड मन्या यादव हा साकेत परिसरात पिस्तूल जवळ बाळगून फिरत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तात्काळ साकेत परिसरात जाऊन मन्या याला बेड्या ठोकत अटक केली.

राज्यात गुरूवारी आषाढी एकादशी व बकरी ईद सण सर्वत्र उत्साहात साजरा केला जात होता. या दोन्ही सणांदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडून कायदा, शांतता आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी कोळसेवाडी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता.

सहाय्यक पोलिस निरीक्षक हरिदास बोचरे हे त्यांच्या पथकासह गस्त घालत असतानाच सराईत गुन्हेगार मनोज उर्फ मन्या बसवराज यादव हा साकेत कॉलेज परिसरात अग्निशास्त्र बाळगून फिरत असल्याची माहिती गुप्त बातमीदाराकडून मिळाली होती. सहाय्यक पोलीस निरीक्षक बोचरे यांनी तात्काळ पथकासह साकेत कॉलेज परिसरात जाऊन मन्या यादव याला ताब्यात घेतले.

अंग झडती दरम्यान या गुंडाकडे एक अग्निशस्त्र आढळून आले. अधिक चौकशी केली असता या गुंडांच्या नावावर खून, खुनाचा प्रयत्न, सशस्त्र हाणामाऱ्यांचे 5 गुन्हे दाखल असल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी मन्या याच्याकडून पिस्तुल हस्तगत केले असून या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT