Mumbai  
मुंबई

Mumbai : चेंबुरमध्ये विकासकांच्या निष्काळजीपणामुळे जमीन खचली; ६० फूट खड्यात दुचाकी वाहने पडली

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - चुनाभट्टी येथील राहुल नगरात खाजगी विकासकांच्या कामामुळे वसंतदादा पाटील प्रतिष्ठान अभियांत्रिकी आणि दृश्य महाविद्यालयाला लागून असलेली जमीन खचली आहे. आज सकाळी ८.३० च्या सुमारास ही घटना घडली.हा खड्डा ५० ते ६० फूट एवढा होता.या खड्यात आजूबाजूला पार्क केलेल्या ३० टू व्हिलर आणि एक कार पडली. त्यामुळे लाखो रुपयाची नूकसान झाले आहे. आजपासून महविद्यालयातील काही शाखा सुरु होणार होते,त्यापुर्वी ही घटना घडल्यामुळे कोणतीही जिवितहानी झाली नसल्याचे कळते.

मुंबईत दरवर्षी पावसात मोठ्या प्रमाणात पडझडी व जमीन, इमारत खचण्याचे प्रकारही घडले आहेत.चुनाभट्टी येथील वसंतदादा पाटील प्रतिष्ठान कॉलेज ऑफ अभियांत्रिकी महाविद्यालय शेजारी राहुल नगर जवळ रौनक ( raunak group ) ग्रुप खाजगी विकासकाचे एसआरए आणि खाजगी इमारतीचे काम गेले कित्येक वर्षे सुरू आहे. विकासकाने एसआरएची इमारत उभी केली आहे.

या इमारतीत रहिवाशी राहण्यास ही गेले आहेत. मात्र खाजगी इमारती उभारण्याकरिता विकासकाने गेल्या सहा ते सात महिन्यापासून खोदकाम सुरू केले होते.मुंबई उपनगरात गेले कित्येक दिवसापासुन सतत मुसळधार पाऊस पडत असल्याने महाविद्यालयाच्या आवाराला लागून जमीन व मुख्य मार्ग पायलिंग सह पूर्णपणे खचला. जमीन खचल्याने एकूण 50 ते 60 फूट खोल खड्डा पडला होता. या घटनेने परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.

हे काम महाविद्यालयाच्या शेजारी सुरू असल्याने खोदकाम सुरू करण्यापूर्वी विकासकाने येथे पत्रे मारलेले आहेत. एसआरए मधील रहिवाशांकरिता येजा करण्याकरीता एक निमुळता मार्ग ठेवला आहे. महाविद्यालयातील परिसरात सकाळी सात वाजल्यापासून खेळाचा सराव करण्याकरिता कित्येक विद्यार्थी येतात.

चार तास लागले

या घटनेची सूचना मिळताच वडाळा, रावली कॅम्प, देवनार, धारावी या विभागातील अग्निशामक दल तात्काळ घटना स्थळी दाखल झाले आहेत.अग्निशमन दलाने चार तासात ही वाहने खड्डातून बाहेर काढले. यासाठी क्रेन मशीनचा वापर करण्यात आला.

विकासकाच्या कामामुळे क़ॉलेजची इमारत खचली आहे. काही भाग खचत आहे.पालिकेला याबाबत पत्रव्यवहार केला आहे. मात्र दुर्लक्ष करण्यात आले. विकासकाने मार्ग सुरू करून दिला पाहिजे. मुलांच्या परीक्षा आहे इतर ठिकाणी घेतल्या आहेत. आम्ही विद्यार्थ्यांना पाच दिवसाच्या सुट्टा दिल्या असून विकासकाला पाच दिवसाची मुदत दिली आहे.

- आप्पा साहेब देसाई ( जनरल सेक्रेटरी)

पाईल्स खोलवर मारले आहे. त्यासाठी 50 लक्ष खर्च केले आहे. त्यामध्ये मी हलगर्जी पणा केला नाही. सुरक्षेतेकरीता पायलिंग 18 मीटर खोलवर मारलेली आहे. बाजूला मोठा नाला आहे.पाणी येत असल्याने ही घटना कदाचित घडली आहे. मी पाच ते सहा दिवसात ती भरणी करुन मार्ग मोकळा करुन देतो.

- राजन बांदोडकर - ठेकेदार

रहिवाशांकरिता छोटा मार्ग ठेवण्यात आला होता.मात्र सुदैवाने कोणीही जखमी झाले नाहीत.

- मारुती जावळे, रहिवाशी

एसआरए प्रकल्पाचे काम सुरु आहे. नाल्यातील पाणी येत असल्याने पायलिंग असुन सुद्धा ही घटना घडली आहे.

- धनाजी हिर्लेकर , सहा.आयुक्त - कुर्ला एल वार्ड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jagan Mohan Reddy: मोठी बातमी! जगनमोहन रेड्डींच्या पक्षाने 'NDA'च्या सीपी राधाकृष्णन यांना जाहीर केला पाठिंबा

Uttar Pradesh : योगी आदित्यनाथ यांनी गोरखपूरमध्ये केले देशातील दुसऱ्या हरित हायड्रोजन प्रकल्पाचे उद्घाटन

ब्रेकिंग! 18 दिवसांत अतिवृष्टीने राज्यातील ‘या’ जिल्ह्यातील 3.73 लाख हेक्टरवरील पिके भुईसपाट; कृषी विभागाचा नजर अंदाज अहवाल; पंचनामे करण्यास ई-पीक पाहणीची अडचण

MP Nilesh Lanke : श्रीरामपूर-परळी ब्रॉडगेज प्रकल्प पुन्हा सुरू करा; नीलेश लंके यांची रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे मागणी

6,6,6,6,6,6! भारतीय गोलंदाजाची T20 मध्ये १९ चेंडूंत फिफ्टी, आठव्या क्रमांकावर आला धुमाकूळ घातला, नंतर ३ विकेट्सही टिपल्या

SCROLL FOR NEXT