Mega block mumbai on Sunday Sakal
मुंबई

Mumbai Local Mega Block : रविवारी मेगाब्लॉक, मुंबईकरांनो टेन्शन नॉट, कधी कुठे कसा सगळं एका क्लिकवर ...!

Mumbai Local Mega Block : तुर्भे ते नेरूळ अप आणि डाऊन ट्रान्स हार्बर मार्गावर मेगाब्लॉक

सकाळ डिजिटल टीम

Mumbai Local Mega Block : उपनगरीय रेल्वे मार्गांवरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी (ता. २७) मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

मध्य रेल्वेच्या ठाणे ते कल्याण अप-डाऊन जलद मार्गावर, हार्बर मार्गावरील पनवेल-वाशी अप आणि डाऊन मार्गावर; तर तुर्भे ते नेरूळ अप आणि डाऊन ट्रान्स हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

मध्य रेल्वे

कुठे : ठाणे ते कल्याण, अप-डाऊन जलद मार्ग

कधी : सकाळी १०.४० ते दुपारी ३.४०

परिणाम : ब्लॉकदरम्यान ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यान जलद मार्गावरील वाहतूक धीम्या मार्गावरून चालविण्यात येणार आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी), दादर स्थानकातून सुटणाऱ्या आणि येणाऱ्या मेल-एक्स्प्रेस ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यान पाचव्या-सहाव्या मार्गिकवरून चालविण्यात येणार आहेत.

हार्बर रेल्वे

कुठे : पनवेल ते वाशी, अप-डाऊन हार्बर मार्ग

कधी : सकाळी ११.०५ ते सायंकाळी ४.०५

परिणाम : ब्लॉक कालावधीत पनवेल येथून सीएसएमटीकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील लोकल आणि सीएसएमटी येथून पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील लोकल रद्द राहतील. पनवेल येथून ठाणेकरिता सुटणाऱ्या अप ट्रान्सहार्बर मार्गावरील लोकल आणि पनवेल येथून ठाणेकरिता सुटणाऱ्या डाऊन मार्गावरील लोकल रद्द राहतील. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते वाशी दरम्यान विशेष लोकल धावणार आहेत.

ट्रान्स हार्बर

कुठे : तुर्भे ते नेरूळ, अप-डाऊन ट्रान्स हार्बर मार्ग

कधी : सकाळी ११.०५ ते

दुपारी ४.०५

परिणाम : नेरूळ येथून ठाण्याकडे जाणाऱ्या अप ट्रान्सहार्बर मार्गावरील लोकल आणि ठाणे येथून नेरूळकडे जाणाऱ्या डाऊन ट्रान्सहार्बर लोकल बंद राहणार आहेत. नेरूळहून खारकोपरकडे जाणाऱ्या आणि खारकोपर येथून नेरूळसाठी सुटणाऱ्या लोकल रद्द राहतील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs KKR Live: W,W,W,W,W! मोहसिन खानने कोलकाताचा निम्मा संघ तंबूत पाठवला; बुमराहच्या पंक्तीत स्थान, दोन मोठे विक्रम

धडा वेगळे शीर करून अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळला महिलेचा मृतदेह; अघोरी पूजेतून नरबळी असल्याची शंका

IPL 2026 Controvarsy: फुल राडा... अंगकृश रघुवंशीच्या विकेटने वातावरण पेटले! अम्पायरने त्याला ढकलले, अभिषेक नायर भांडला Video

रॅडिसनची मोठी भरारी! २०३० पर्यंत भारतात ५०० हॉटेल्सचं लक्ष्य; ८० हजार तरुणांना मिळणार रोजगाराची सुवर्णसंधी

मुंबई उच्च न्यायालय भरतीत मोठा वाद! ‘राष्ट्रभाषा’ प्रश्नावरून संताप उसळला; मराठी एकीकरण समिती आक्रमक

SCROLL FOR NEXT