Mumbai Local 
मुंबई

Mumbai Local : मेगाब्लॉकने ऐन लग्नसराईत मुंबईकरांचे मेगाहाल

सकाळ वत्तसेवा

मुंबई : एकीकडे रखरखत्या उन्हामुळे मुंबईकरांच्या अंगाची काहिली होत असताना दुसरीकडे लग्नसराईच्या खरेदीला बाहेर पडलेल्या मुंबईकरांचे रविवारी घेण्यात आलेल्या मेगाब्लॉकमुळे प्रचंड हाल झाले आहे.

रविवार वेळापत्रकामुळे निम्म्या लोकल फेर्‍या रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे मध्य आणि हार्बर मार्गावरील प्रवाशांना लोकल गर्दीचा सामना करावा लागला आहे. ब्लॉक संपून देखील रात्री उशिराने मध्य रेल्वेवरील लोकल विलंबाने धावत होत्या.

उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर माटुंगा ते ठाणे स्थानकांदरम्यान अप आणि डाउन धिम्या मार्गावर सकाळी ११ ते दुपारी ४वाजेपर्यत मेगाब्लॉक घेण्यात आला होता. त्यामुळे धिम्या मार्गावरील वाहतुक जलद मार्गावरुन चालविण्यात आली.

यावेळी नाहूर,विद्या विहार आणि कांजूरमार्गवर स्थानकावर लोकल सेवा बंद करण्यात आली होती. त्यामुळे नागरिकांना रस्त्या मार्गाने दुसरे स्थानक गाठावे लागले आहे. तसेच या लोकल सेवा आपल्या निर्धारित वेळेपेक्षा २० ते २५ मिनिटे उशिराने धावत असल्याने लोकलला प्रचंड गर्दी झाली होती. याशिवाय ठाणे,घाटकोपर, कुर्ला आणि दादर स्थानकात गर्दी पाहायला मिळाली आहे.

हार्बर मार्गावर पनवेल ते वाशी दरम्यान अप- डाऊन मार्गावर सकाळी ११ ते संध्याकाळी ४. ०५ वाजेपर्यत मेगाब्लॉक घेतला होता. या ब्लॉककालावधीत लोकल सेवा पुर्णपणे बंद होती. त्यामुळे हार्बर मार्गावरुन सीएसएमटीला जाणार्‍या प्रवाशांचे हाल झाले. सानपाडा ते पनवेल दरम्यानच्या नागरिकांना वाशी स्थानकात येण्यासाठी रस्ते मार्गाचा वापर करावा लागला.

कामोठे हायवे,नेरुळ एलपी येथून वाशी स्थानकाकडे येण्यासाठी प्रवाशांना एसटी,बेस्ट,नवी मुंबई महानगरपालिकेच्या बसचा आधार घ्यावा लागला. परंतु तेथेही प्रवाशांना गर्दीतून प्रवास करावा लागला. वाढलेल्या उकाड्यात गर्दीतून प्रवास करताना प्रवासी हैराण झाले आहे. यामुळे प्रवाशांना दुहेरी त्रास सहन करावा लागला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT