मुंबई

Mumbai Local News: रेल्वे रुळावर गप्पा मारत बसले.. लोकलच्या धडकेत 14 वर्षीय मुलीचा मृत्यू , मित्र थोडक्यात बचावला

Latest Uran News:मुलीचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री बामणडोंगरी रेल्वे स्टेशन जवळ घडली

सकाळ वृ्त्तसेवा

Navi Mumbai News: मित्रासह रात्रीच्या सुमारास नेरुळ उरण रेल्वे मार्गावर फिरण्यासाठी गेलेल्या एका 14 वर्षीय मुलीला भरधाव लोकलची धडक लागल्याने सदर मुलीचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री बामणडोंगरी रेल्वे स्टेशन जवळ घडली.

या अपघातात मृत मुलीच्या 17 वर्षीय मित्राचा देखील हात फ्रॅक्चर झाला आहे. एनआरआय पोलिसांनी या घटनेनंतर मृत मुलीच्या जखमी मित्रावर निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला आहे.

या घटनेतील 14 वर्षीय मृत मुलगी व 17 वर्षीय तिचा मित्र हे दोघेही उलवेतील एकाच सेक्टरमध्ये राहण्यास आहेत. त्यामुळे या दोघांमध्ये काही दिवसापुर्वीच मैत्री झाली होती. गत शनिवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास हे दोघे भेटल्यानंतर ते दोघे बामणडोंगरी रेल्वे स्थानकाजवळून नेरुळ उरण रेल्वे रुळावर गेले होते.

यावेळी दोघेही रेल्वे रुळालगत अंधारात बराचवेळ गप्पा मारत बसले होते. यावेळी त्यांना उरण येथून नेरूळ च्या दिशेने जाणाऱ्या लोकलचा अंदाज आला नाही. यावेळी लोकलच्या मोटरमनने हॉर्न वाजवल्यानंतर तरुणाने बाजुला उडी मारली. मात्र मुलीला उठता न आल्याने तिच्या डोक्याला लोकलचा फटका बसल्याने मुलीचा जागीच मृत्यू झाला.

या प्रकारानंतर घाबरलेल्या तरुणाने या घटनेची माहिती मृत मुलीच्या नातेवाईकांना अथवा इतर कुणाला न देता त्याठिकाणावरुन जखमी अवस्थेत पलायन केले. हा प्रकार उलवे भागातील काही तरुणांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी एनआरआय पोलिसांना माहिती दिली.

त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पहाणी केली असता, त्यांना रेल्वे रुळालगत मुलीचा मृतदेह आढळुन आला. पोलिसांनी सदरचा मृतदेह ताब्यात घेऊन रुग्णालयात पाठवून दिला. त्यानंतर पोलिसांनी मृत मुलीसोबत असलेल्या तरुणाकडे अधीक चौकशी केल्यानंतर दोघेही रेल्वे रुळालगत फिरण्यासाठी गेले असताना, मुलीला लोकलची धडक लागल्याचे त्याने सांगितले. या दुर्घटनेत तरुणाचा हात देखील फ्रॅक्चर झाल्याचे आढळुन आले आहे.

दरम्यान नेरुळ उरण रेल्वे रुळावर लोकलची वाहतून सुरु असल्याने त्यावर जाणे धोकादायक आहे, याची माहिती असताना, सुद्धा या घटनेतील तरुणाने आपल्या 14 वर्षीय मैत्रीणीला अंधारात बामणडोंगरी रेल्वे रुळावर नेल्यामुळे सदरची दुर्घटना घडल्याचे आढळुन आले आहे. त्यामुळे एनआरआय पोलिसांनी या घटनेला जबाबदार धरुन त्याच्या विरोधात निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या सलग चार पराभवामागची ५ कारणं! हार्दिक पांड्या अजूनही नाही सुधरला, तर...

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT