मुंबई

उद्या कुठे, कधी आणि किती वेळ मेगाब्लॉक ? वाचा सविस्तर बातमी

कुलदीप घायवट

मुंबई : हार्बर, ट्रान्स हार्बर  आणि पश्चिम रेल्वेच्या उपनगरी मार्गावर देखभाल आणि दुरुस्तीसाठी उद्या रविवारी (ता.14) रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यावेळी सकाळी 10.00 ते संध्याकाळी 4.30 या वेळेत हार्बर मार्गावरील प्रवाशांना मुख्य मार्गाने प्रवास करण्याची परवानगी दिल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे. ब्लॉकदरम्यान सीएसएमटी ते कुर्ला आणि वाशी ते पनवेल या दरम्यान विशेष लोकल चालविण्यात येणार आहेत. तर, मध्य रेल्वे मार्गावर ब्लॉक नसेल.

कुठे : कुर्ला-वाशी अप आणि डाऊन मार्ग 
कधी : सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 दरम्यान
परिणाम : सीएसएमटी ते पनवेल / बेलापूर/ वाशी अप आणि डाऊन लोकल सेवा ब्लॉक दरम्यान बंद राहतील. वांद्रे/गोरेगाव ते सीएसएमटी अप आणि डाऊन लोकल सेवा ब्लॉक दरम्यान बंद राहतील. या ब्लॉक कालावधीत सीएसएमटी- कुर्ला, वाशी ते पनवेल दरम्यान विशेष लोकल सोडण्यात येणार आहे.

कुठे : ठाणे-वाशी/नेरुळ अप आणि डाऊन मार्ग 
कधी :
सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 दरम्यान
परिणाम : ब्लॉकवेळी ठाणे-वाशी/नेरुळ/पनवेल अप आणि डाऊन लोकल सेवा बंद राहतील.

कुठे : मरीन लाईन्स ते माहीम दरम्यान डाऊन धिम्या मार्गावर
कधी :
सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 पर्यंत
परिणाम : या ब्लॉक कालावधीत मरीन लाईन्स ते माहीम दरम्यान डाऊन धिम्या मार्गावरील लोकल डाऊन जलद मार्गावर वळविण्यात येतील.  महालक्ष्मी, प्रभादेवी आणि माटुंगा रोड स्थानकादरम्यान जलद मार्गावरील फलाट नसल्या कारणाने येथे लोकल थांबा नसेल.

mumbai local news complete details of local train megablock to be taken on 14th march

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT