mumbai local train delay even Cancel megablock ganesh festival 2023 monsoon rain  sakal
मुंबई

Mumbai News : रविवार वेळापत्रकामुळे मुंबईकरांचे हाल

सध्या गणेशोत्सवानिमित्त घराबाहेर पडणार्‍या भक्तांची गैरसोय होऊ नये म्हणून रविवारी तिन्ही मार्गावर ब्लॉक घेतलेले नाही.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : रविवारच्या सुट्टीचा मुहूर्त गाठून गणपती दर्शनासाठी घराबाहेर पडणार्‍या मुंबईकरांच्या सोईसाठी मध्य- पश्चिम रेल्वेने उपनगरीय रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक रद्द केला असला तरी,रविवार वेळापत्रकानुसार लोकल धावल्याने मुंबईकरांचे हाल झाले आहे.

तसेच सकाळीपासून पावसाची रिपरिप सुरु असल्याने लोकलचे वेळापत्रकावर परिणाम दिसून आला आहे आहे. रेल्वेकडून रूळांच्या आणि सिग्नल यंत्रणेच्या नियमित देखभाल-दुरूस्तीसाठी आठवड्याच्या प्रत्येक रविवारी मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर ब्लॉक घेतला जातो.

मात्र सध्या गणेशोत्सवानिमित्त घराबाहेर पडणार्‍या भक्तांची गैरसोय होऊ नये म्हणून रविवारी तिन्ही मार्गावर ब्लॉक घेतलेले नाही. मात्र, सुट्टीच्या वेळापत्रकामुळे लोकल सेवा धावल्याने आणि रविवारी साकळीपासून पाऊस सुरु असल्याने मुंबईकरांचे हाल झाले आहे.

गणेशोत्सवामधील शेवटचा रविवार असल्याने मुंबईकरांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे गणपती बघण्यासाठी मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडले होते. रविवार वेळापत्रकानुसार लोकल चालविल्या.परिणामी लोकलची संख्या कमी असल्याने प्रवाशांना गर्दीचा सामना करावा लागला.

विशेष म्हणजे दादर, कुर्ला, वांद्रे, अंधेरी,घाटकोपर, ठाणे, डोबिवली रेल्वे स्थानकात प्रवाशांची गर्दी दिसून आली. विशेष म्हणजे पावसामुळे लोकलची गती कमी झाल्यामुळे अनेक लोकल सेवा उशिराने धावत असल्याने प्रवाशांना मोठे हाल झाले आहे.

मध्य रेल्वेचे वेळापत्रक

सोमवार ते शुक्रवार- -शनिवार- रविवार

मुख्य मार्गावर - ८९४- -८९३-६८७

हार्बर मार्ग- ६०८- ६०८-४९९

ट्रान्स हार्बर मार्गावर -२६२-२६२-२४६

नेरुळ-खारकोपर- ४०-४०-४०

एकुण-१८१०-१८०३-१४७४

रविवारी मेगाब्लॉक रद्द केल्यामुळे आम्हाला दिलासा मिळेल ही अपेक्षा होती. मात्र, रविवारी लोकल सेवांची संख्या कमी असल्याने लोकल गर्दीचा सामना करावा लागला. रेल्वेने सणासुदीत तरीही सुट्टीच्या वेळापत्रकानुसार लोकल सोडू नयेत,

- स्वाती सावंत, महिला

सुट्टीच्या दिवस असल्याने सहकुटूंबीय लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी घराबाहेर पडलो होतो, मात्र लोकल सेवा वेळेवर नसल्याने प्रचंड हाल झाले. रेल्वेने गणेशोत्सव काळात तरी लोकल फेऱ्यांची संख्या वाढवणे गरजेचे होते.

- वैभव काकडे, प्रवासी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trump wishes Modi : ट्रम्प यांनी केला मोदींना फोन दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा अन् म्हणाले...

High Court Decision : उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय! अवैध विवाह संबंधातून जन्मलेल्या मुलाला वडिलांच्या मालमत्तेत वाटा मिळण्याचा हक्क

Athletics Championships: छत्रपती शिवाजी महाराज की जय! चीनमध्ये सर्वेश कुशारेची जागतिक मैदानी स्पर्धेत अभिमानास्पद कामगिरी

Israel-Gaza War: इस्राईलकडून गाझा शहरात लष्करी कारवाईला सुरुवात; नागरिकांना दक्षिणेकडे निघून जाण्याचं आवाहन

Devendra Fadnavis: ''मी शंभर रुपये द्यायला तयार आहे, पण...'' उद्धव ठाकरेंच्या भाषणावरुन फडणवीसांचं आवाहन

SCROLL FOR NEXT