Mumbai Rain Update sakal
मुंबई

Mumbai Rain Update: सलग तिसऱ्या दिवशी मुंबईकरांचे हाल, पावसामुळे लोकल विलंबाने !

Mumbai: मोटरमनला लोकलचा वेग कमी करण्याच्या सूचना आहे.परिणामी लोकलचा वेग कमी झाल्याने गाडयांचे वेळापत्रक कोलमडले.

सकाळ वृत्तसेवा

Mumbai Local Latest Update: सलग तिसऱ्या दिवशी मुंबईसह नवी मुंबई,ठाणे शहरात पावसामुळे रेल्वे वाहतुकीला फटका बसला आहे.पावसामुळे उपनगरीय लोकलचा वेग मंदावल्याने प्रवाशांचे हाल झाले. यामुळे तिन्ही मार्गावरील लोकल सेवा १० ते १५ मिनिटे विलंबाने धावत असल्याने प्रवाशांना लोकल गर्दीचा सामना करावा लागला आहे.

मंगळवारी सकाळीपासून पावसाचा जोर कायम होता. कल्याण,अंबरनाथ,बदलापूर येथे देखील पाऊस सरी कोसळत होत्या. त्यामुळे सकाळी सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या लोकलच्या वेळापत्रकावर परिणाम झाला.

तसेच दिवसभर ढगाळ वातावरणामुळे हवेतील दृष्टमानता कमी असल्याने समोरचे स्पष्ट दिसत नाही.यामुळे मोटरमनला लोकलचा वेग कमी करण्याच्या सूचना आहे.परिणामी लोकलचा वेग कमी झाल्याने गाडयांचे वेळापत्रक कोलमडले.

सीएसएमटीकडे येणाऱ्या अप मार्गावरील लोकल विलंबाने धावत असल्याने डाउन मार्गावरील लोकल देखील उशिराने धावत होत्या.त्यामुळे प्रवाशांना गर्दीचा सामना करत नाहक त्रास सहन करावा लागला. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील लोकल १५ ते २० मिनिटे उशिराने धावत होत्या. हार्बर मार्गावरील सीएसएमटी- बेलापूर,पनवेल मार्गावरील लोकल १० ते १५ मिनिटे विलंबाने सुरु होत्या. तर पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल सेवा १० ते १५ मिनिटे विलंबाने धावत होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शहांचा निरोप चंद्रकांत दादांनी मोहोळना दिला, जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द; शिंदेंना शब्द दिल्यानं धंगेकर गप्प, काय घडलं?

अखेर जैन बोर्डिंगचा जमीन खरेदी व्यवहार रद्द, गोखले बिल्डर्सचा मोठा निर्णय

Female Doctor Case: हे तर गलिच्छ राजकारण, महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी रणजितसिंह यांनी मुख्यमंत्र्यांसमोरच सांगितलं..

Panchang 27 October 2025: आजच्या दिवशी मंगल चंडिका स्तोत्र पठण व ‘अं अंगारकाय नमः’ या मंत्राचा जप करावा

Latest Marathi News Live Update : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबई दौऱ्यावर, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT