Mumbai Local Train 
मुंबई

Mumbai Local Train : आता मोबाईल युटीएस अँपमधील तिकीटच दाखवा, अन्यथा...

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : रेल्वे प्रवाशांकडून युटीएस अँपवरून बनावटी तिकीट आणि एकाच युटीएस तिकिटांच्या स्क्रीन शॉर्टवर अनेक प्रवासी प्रवास करत असल्याचा घटना नुकताच समोर आल्या आहे.

या घटनेनंतर पश्चिम रेल्वेने डिजिटल तिकीट तपासणी सुरु केली आहे. याशिवाय युटीएस अँप वापरणाऱ्या प्रवाशांनी फक्त युटीएस अँपमधील तिकीटच टीसीना दाखवीत अन्यय कोणत्याही माध्यमातून तिकीट दाखविल्यास ते युटीएस तिकीट अवैध मानले जाणार आहे.

प्रवाशांना तिकीट खिडक्यांवर तासन्-तास उभे राहून बराच वेळ खर्ची करावा लागत असल्याने रेल्वे प्रशासनाने तिकीट खिडक्यांवर प्रवाशांचा वेळ वाचविण्यासाठी डिजिट इंडियनांतर्गत एटीव्हीएम मशीनसोबतच मोबाईल तिकिटांचा पर्याय प्रवाशांना उपलब्ध करुन दिला आहे.

एप्रिल २०१७ ला या युटीएस मोबाईल अ‍ॅपचे युजर्स एकूण तीन लाख ७४ हजार होती. पाहिजे तितका प्रतिसाद मिळत नव्हता. मात्र रेल्वेने यूटीएस मोबाइल अ‍ॅपची लोकप्रिय वाढविण्यासाठी मिशन मोडव या अ‍ॅपची जनजागृती मोहीम राबविण्यात आली होती.

तसेच मोबाइल तिकीटला प्रतिसाद वाढावा यासाठी कमी अंतराची अट शिथिल केली आहे. त्यामुळे उपनगरीय प्रवाशांमध्ये युटीएस अँपची लोकप्रिय कमी कालावधीत प्रचंड वाढली आहे. त्याचबरोबर युटीएस अँपवरून बनावटी तिकीट आणि एकाच युटीएस तिकिटांच्या स्क्रीन शॉर्टवर अनेक प्रवासी प्रवास करत असल्याचा घटनाही घडत आहे. त्यामुळे रेल्वेची डोकेदुखी वाढली आहे.

अलीकडेच तिकीट तपासणी कर्मचार्‍यांना युटीएस अँपची बनावटी तिकिटांची काही प्रकरणे आढळून आली. ज्यामध्ये एसी लोकल ट्रेनची बनावट मासिक सीझन तिकिटे ओळखली गेली. अशा फसवणुकीला आळा घालण्यासाठी आणि अशा बनावट प्रकरणांवर नजर ठेवण्यासाठी, फक्त आता युटीएस अँपमधील तिकीटच टीसीना दाखवीत अन्यय कोणत्याही माध्यमातून युटीएस तिकीट अवैध मानले जाणार नाही.

अलीकडेच तिकीट तपासणी कर्मचार्‍यांना युटीएस अँपची बनावटी तिकिटांची काही प्रकरणे आढळून आली. ज्यामध्ये एसी लोकल ट्रेनची बनावट मासिक सीझन तिकिटे ओळखली गेली. अशा फसवणुकीला आळा घालण्यासाठी प्रवाशांनी रेल्वेला सहकार्य करावेत. यूटीएस मोबाईल अँपद्वारे काढलेल्या तिकिटे प्रवाशानी तिकीट तसनीसांना आपल्या यूटीएस मोबाईल अँपच्या 'इश्यूड तिकीट विभागात' दाखवावीत. इतर कोणतेही माध्यमातून दाखवू नयेत.

- सुमित ठाकूर, मुख्य जनसंपर्क अधिकारी, पश्चिम रेल्वे

मोबाईलद्वारे तिकिट-

- मध्य रेल्वेवर दिवसाला सुमारे ९० हजार

- पश्चिम रेल्वेवर दिवसाला सुमारे २५ हजार

- तिकीट खिडकी – ६० ते ६५ टक्के

- एटीव्हीएम – २० ते २१ टक्के

- जेटीबीएस केंद्रावर - ८ ते ९ टक्के

- मोबाईल ॲप- ८ टक्के

पश्चिम रेल्वेवरील दिवसाची मोबाईल तिकिट विक्री

अंधेरी- ६,४७२

बोरीवली-४९८१

विरार-४०३२

गोरेगाव-२६८८

कांदिवली-२४३६

मोबाइल तिकिटाचे फायदे

- रांगेत उभे राहण्याची गरज नाही

- कॅशलेस व्यवहार

- पेपरलेस तिकीट व्यवहार

- सर्व अनारक्षित प्रवास तिकिट

-तिकिटाचे पेमेंट इनबिल्ट “R-Wallet” द्वारे

- डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, UPI या पेमेंट सुविधा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pak Rapper Indian Flag : पाक रॅपरने शो मध्ये फडकवला 'तिरंगा'! पाकिस्तानात संतापाची लाट, व्हिडिओ व्हायरल, काय घडलं नेमकं?

WPL 2026 Date: मोठी बातमी! महिला प्रीमियर लीग २०२६ कधीपासून सुरू होणार? तारीख आली समोर

नॅशनल क्रश झाल्यानंतर दोन दिवसात गिरीजा ओकचे किती फॉलोवर्स वाढले? आकडा वाचून भुवया उंचावतील

१० वी पास...१० वर्षांचा प्रिटिंगचा अनुभव...YouTube बघून तयार केल्या बनावट नोटा अन्...; पठ्ठ्याची करामत वाचून व्हाल थक्क

Mumbai News: मुंबईला जागतिक दर्जाचे टनेल मत्स्यालय मिळणार! कुठे अन् कधी पूर्ण होणार? बीएमसीने संपूर्ण योजना सांगितली

SCROLL FOR NEXT