मुंबई

लॉकडाउनचा धसका! नालासोपाऱ्यात मद्यप्रेमींनी वाईन शॉपबाहेर लावल्या रांगा

विजय गायकवाड

राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाउन करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे कधीही अचानकपणे लॉकडाउन होईल या भीतीने मद्यपींनी वाईन शॉपच्या बाहेर रांगा लावल्या आहेत.  नालासोपाऱ्यात वाईन शॉपच्या बाहेर नागरिकांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी केली असून यावेळी सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडाल्याचं दिसून येत आहे.

मागच्यावर्षी अचानक लॉकडाउन घेण्यात आल्यामुळे अनेक मद्यपीची मोठी तारांबळ उडाली होती. त्यामुळे यावेळी अशी परिस्थिती येऊ नये यासाठी मद्यप्रेमींनी शनिवारी रात्रीपासूनच वाईन शॉपच्या बाहेर गर्दी केली आहे. नालासोपारा पूर्व येथील नगीनदास पाडा या भागात असलेल्या वाईन शॉपच्या बाहेर नागरिकांनी रांग लावल्याचं पाहाया मिळत आहे.

सध्या रात्री 8 ते सकाळी 7 या वेळेत नाईट कर्फ्यु सुरू असून शनिवारी सायंकाळी कामावरून घरी जाणाऱ्या मद्यपींनी घरी न जाता थेट वाईन शॉपची वाट धरल्याचं दिसून आलं.

संपादन - शर्वरी जोशी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Old Monkच्या चाहत्यांनो सावधान! ७ वर्ष जुन्या दाव्यावर कंपनीची माघार, बाटलीचा लेबल बदलणार

Manoj Jarange Patil : जरांगेंचा ‘चलो मुंबई’ नारा! मराठा बांधव मुंबईकडे कूच करण्यासाठी सज्ज

OBC Mahamorcha : ओबीसी समाजाची मोठी तयारी! १ सप्टेंबरला पाटसहून महामोर्चा

फेक नॅरेटिव्हचा आरोप, राहुल गांधींवर निशाणा अन् CJPचा नवा अर्थ; फडणवीसांच्या भाषणात काय काय?

Hockey: भारत आठव्या स्थानावर राहिल्याने हॉकी इंडियाचे अध्यक्ष नाराज; विश्वचषकातील कामगिरीवर दिलीप तिर्की म्हणाले, “मीही खूश नाही”

SCROLL FOR NEXT