mumbai local sakal
मुंबई

Mumbai Local : करीरोड स्थानकाजवळील तांत्रिक बिघाड दुरूस्त; मध्य रेल्वेची वाहतूक सुरळीत

निनाद कुलकर्णी

Mumbai Center Railway Local Service Disturb : मुंबईत लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मध्य रेल्वेच्या जलद मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत झाल्याने नाहक त्रासाला सामोरे जावे लागले. दरम्यान, करी रोड स्थानकावर झालेला तांत्रिक बिघाड दुरूस्त करण्यात रेल्वे प्रशासनाला यश आले असून, विस्कळीत झालेली रेल्वे सेवा पुन्हा सुरळीत झाली आहे. तांत्रिक बिघाडामुळे या मार्गावरील रेल्वेची जलद सेवा विस्कळीत झाली होती. करीरोड स्थानकाजवळ तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ही वाहतूक विस्कळीत झाली होती. या तांत्रिक बिघाडामुळे करीरोड स्थानकाजवळ एक एक्स्प्रेसदेखील रखडली होती.

आज आठवड्याचा पहिलाच दिवस असून, यामुळे कामावर जाण्यासाठी सर्वच रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी असते. त्यात अनेकजण कामावर जाण्यासाठी जलद रेल्वेने प्रवास करण्यास प्राधान्य देतात. मात्र, आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी करी रोड स्थानकावर तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची जलद वाहतूक रखडली होती. यामुळे कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांचे मोठ्या प्रमाणावर अडचण निर्माण झाली होती. मात्र, उद्भवलेला तांत्रिक बिघाड रेल्वे कर्मचाऱ्यांकडून त्वरीत दुरूस्त करण्यात आल्यामुळे आता या मार्गावरील रेल्वेची सेवा पुन्हा पुर्ववत करण्यात यश आले आहे. तांत्रिक बिघाडामुळे साधारण अर्ध्या तासा जलद मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'मराठा आरक्षण देण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती लागते'; सात दिवसांत आरक्षण देतो म्हणणाऱ्या फडणवीसांवर काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा घणाघात

Nagpur Court: परस्पर संमतीने झालेले संबंध अत्याचार ठरत नाही; उच्च न्यायालय, वकील महिलेची बेलतरोडी पोलिस ठाण्यात तक्रार

Shaktipeeth Protest : ‘शक्तिपीठ’विरोधी आंदोलन होणार तीव्र, सतेज पाटील, राजू शेट्टींची ताकद लागणार पणाला...

Video : "आरतीपेक्षा धिंगाणा जास्त" गणपतीच्या पूजेला कलाकारांचा डान्स पाहून नेटकरी भडकले ! म्हणाले..

Maratha Reservation : अटल सेतूवर मराठा आंदोलक प्रचंड आक्रमक; पोलिसांशी चकमक; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी

SCROLL FOR NEXT