इमारत दुर्घटनेतून बचावलेले मोहम्मद रफी 
मुंबई

दूध आणायला गेल्याने रफी बचावले पण संपूर्ण कुटुंब संपलं

मालवणी इमारत दुर्घटनेत संपूर्ण कुटुंब संपलं

सुमीत सावंत, मुंबई

मुंबई: मुंबईतील मालवणी भागात (mumbai malvani area) काल झालेल्या मुसळधार पावसामुळे चार मजली इमारत कोसळली. या भीषण दुर्घटनेमध्ये तब्बल ११ जणांना आपला प्राण गमवावा लागला आहे. याच दुर्घटनेमध्ये मोहम्मद रफी यांचं संपूर्ण कुटुंबच संपलं आहे. (mumbai malvani area building collapse except mohammed rafi all family members died)

मुंबईत पावसाळ्यात इमारत कोसळण्याच्या घटना काही नवीन नाहीत. काल रात्री देखील मुंबईतील मालाड मालवणीत पहिल्याच पावसात इमारत कोसळण्याची घटना घडली. या दुर्घटनेत या इमारतीत राहणारे ११ जण दगावले . तर १८ जण जखमी झालेत. या इमारतीत एका घरात राहणारे मोहमद रफी काल रात्री ही दुर्घटना घडली तेव्हा दूध आणण्यासाठी बाहेर पडले, पण घरी आले तेव्हा त्यांचं संपूर्ण कुटुंब ढिगाऱ्याखाली अडकल असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं.

धक्कादायक बाब म्हणजे या अपघातामध्ये मोहम्मद रफींच्या ६ मुलांसह कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू झाला आहे. मोहम्मद रफी यांच्या कुटुंबात सहा मुले व चार वयस्कर लोक होते. नेहमीप्रमाणे दुध आणण्यासाठी ते गेले पण परत आल्यानंतर त्यांच्या काळाजाचा ठोका चुकला होता. त्यांचं हसतं खेळतं कुटुंब या दुर्घटनेत पूर्णपणे संपलं होतं.

या आधी देखील या परिसरात अशा घटना घडल्या आहेत. कारण ही संपूर्ण जागा जिल्हाधिकारी अखत्यारीतील आहे. त्यामुळे इथे अनधिकृत बांधकामे अनेक झाली आहेत. चिंचोळे रस्ते आहेत. दुर्घटना घडल्यानंतर अग्निशमन दलाला बचाव कार्य करताना अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं होतं. बचाव कार्यात १८ जखमीअवस्थेत सापडले, तर ११ जणांचे मृतदेह आढळले .

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI on Inflation: दिवाळीत महागाईचा फटका बसणार? RBI गव्हर्नरांचा मोठा इशारा; कारण काय?

NCP Politics: मोठी राजकीय घडामोड! रुपाली चाकणकरांनंतर अखेर नवे नेतृत्व; वैशाली नागवडे यांच्याकडे NCP महिला प्रदेशाध्यक्षपदाची धुरा

Haridwar: कांवड भक्तांवर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी; मुख्यमंत्र्यांनी पाय धुवून केले स्वागत, video viral

Latest Marathi News Live Update : झारखंडमधील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा, अभिजीत दिपकेंची प्रतिक्रिया

दोघात तिसरा! अमृता आणि हिमांशूच्या नात्यात 'त्या' व्यक्तीमुळे दुरावा? नेटकऱ्यांनी थेट अभिनेत्याचं नावच घेतलं; कोण आहे तो?

SCROLL FOR NEXT