Metro Working Sakal
मुंबई

मुंबईत मेट्रोचे काम सुरु असताना अपघात; क्रेन ड्रायव्हरचा जागीच मृत्यू

मुंबईत मेट्रोचे काम सुरु असताना अपघात होऊन एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडलीय.

दत्ता लवांडे

मुंबई : मुंबईत मेट्रोचे काम सुरु असताना अपघात होऊन एकाचा मृत्यू (Death) झाल्याची घटना घडलीय. जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर रविवारी सकाळी मेट्रो लाईनचे गर्डर टाकण्याचे काम सुरू असताना तेथील क्रेन कोसळून हा अपघात घडला. या अपघातात क्रेनच्या ड्रायव्हरचा जागीच मृत्यू झाला. मृत ड्रायव्हरचे नाव लवदीप रविंद्र सिंग असे असून तो ५०० टन क्षमता असणाऱ्या क्रेनचा चालक होता. MMRDA च्या अंतर्गत चालू असलेल्या जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर हा अपघात घडला. (Mumbai Metro Work Accident)

ही घटना सकाळी ६ च्या सुमारास घडली असून JVLR च्या सिग्नलजवळ दोन क्रेनच्या सहाय्याने मेट्रोचे गर्डर टाकण्याचे काम चालू होते. दोन क्रेनने एकावेळी गर्डर टाकताना एका क्रेनकडील माती खचली व त्यानंतर एक क्रेन वर जाऊन समतोल बिघडला. त्यानंतर एकापाठोपाठ क्रेन कोसळून ड्रायव्हर क्रेनखाली दाबला गेला. त्यानंतर दुसऱ्या क्रेनच्या सहाय्याने दबलेल्या ड्रायव्हरला काढण्यात आले असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

घटनेनंतर ड्रायव्हरला राजावाडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. कांजुरमार्ग पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून या घटनेत दुसरे कुणीही जखमी झाले नसल्याचे स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! भरधाव कंटेनरने २२ वाहनांना फरफटत नेले अन्...

IND vs NZ, 4th ODI: न्यूझीलंड ऑलआऊट, तरी भारतासाठी विजय कठीण! आजपर्यंत कधीच घडलं नव्हतं, ते घडवण्याची संधी

'त्या सेटवर नेमकं काय घडलं, मला सगळ्यांनी सांगितलं'; नाना पाटेकर-तनुश्री दत्ता प्रकरणावर महेश मांजरेकरांचं मोठं वक्तव्य

श्रीवर्धनला 'ब्ल्यू फ्लॅग'! सागरी किनाऱ्याला जागतिक स्तरावर नवी ओळख; रोजगाराची संधी

Latest Marathi News Live Update : सांगली जिल्हा बँक अध्यक्षांची निवड बुधवारी; महेंद्र लाड, विश्वजित कदम, देवराज पाटील शर्यतीत

SCROLL FOR NEXT