Milk Price esakal
मुंबई

Mumbai Milk Rate : मुंबईत दूध महागणार, प्रतिलिटर 2 ते 3 रुपयांची होणार वाढ !

Mumbai Milk Rate : 1 सप्टेंबरपासून सुटे दूध महागणार

सकाळ डिजिटल टीम

Mumbai Milk Rate : सर्वसामान्य मुंबईकरांना महागाईचा चटका लावणारी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे मुंबईमध्ये दुधाचे दर वाढणार आहेत.

मिळालेली माहिती अशी कि, 1 सप्टेंबरपासून सुटे दूध महागणार आहे. प्रति एक लीटर म्हशीचे सुटे दूध हे २-३ रुपयांनी महागणार आहे. तर होलसेल दर हे २ रुपयांनी महागणार आहेत. हा निर्णय शनिवारी दूध विक्रेत्यांच्या बैठकीत घेण्यात आला.

जनावरांना लागणारा चारा महागल्याने दूध उत्पादकांवर याचा परिणाम होत आहे. यामुळे हा दरवाढीचा निर्णय घेण्यात आला असून आता २-३ रुपयांनी दूध महागणार आहे.

सध्या म्हशीच्या सुटे एक लीटर दूधाचा दर 85 रुपये आहे. हा दर 87 ते 88 रुपये होईल. जे ब्रॅन्डेड किंवा पॅकेटबंद दूध नसते, ज्याची विक्री सुट्या पद्धतीने केली जाते अशा दुधाच्या किमतीत वाढ होणार आहे.

ब्रॅण्डवर परिणाम नाही

एक लिटर म्हशीचे सुटे दुध रिटेलमध्ये 2 ते 3 रुपयांनी महागणार तर होलसेल दरातही 2 रुपयाने वाढ होणार आहे.जनावरांच्या चाऱ्याचे भाव वाढले आहेत. चाऱ्याच्या दरात वाढ झाल्याने याचा परिणाम दूध उत्पादकांवर होत आहे. हे पाहता दूध उत्पादकांनी सुट्या दुधाच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court चे माजी न्यायाधीशच उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांविरोधात सर्वोच्च न्यायालयात; नेमकं काय घडलं?

AUS vs BAN 1st Test: बांगलादेश ऐतिहासिक विजयाच्या उंबरठ्यावर; ऑस्ट्रेलियाला रडवले, कसोटीचा इतिहास-भूगोल बदलणारा सामना...

Western Railway: ३० लाखांच्या गर्दीसमोर पश्चिम रेल्वे हतबल; २,५५९ पदे रिक्त, नियंत्रणासाठी कंत्राटी मनुष्यबळाचा आधार

Marathi News Live Updates : पंजाब हरियाणातील शेतकऱ्यांचा आज दिल्लीकडे मोर्चा

UP Freedom Struggle Circuit: स्वातंत्र्यलढ्याच्या आठवणी आता पर्यटकांना अनुभवता येणार; यूपीमध्ये ‘स्वातंत्र्य संग्राम सर्किट’

SCROLL FOR NEXT