mucormycosis
mucormycosis sakal media
मुंबई

मुंबईत म्युकरमायकोसिसचा मृत्यूदर २० टक्क्यांवर, जाणून घ्या सविस्तर

- समीर सुर्वे

मुंबई : म्युकर मायकोसिस आजाराचा (Mucormycosis Deaths) मृत्यूदर तब्बल 20 टक्क्यांवर पोहचला आहे. आतापर्यंत या बुरशीजन्य आजाराच्या 884 रुग्णांवर उपचार (Mucormycosis patient treatment) करण्यात आले असून असून त्यातील 178 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.तर,सध्या 135 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. 571 रुग्णांना आतापर्यंत या आजारावर मात (Mucormycosis free patient) केली आहे. ( mumbai-Mucormycosis Deaths-Mucormycosis patient treatment-Mucormycosis free patient-nss91)

कोविडच्या उपचाराचा साईड इफेक्टमुळे रूग्णांना हा बुरणीजन्य आजार होत होता.प्रामुख्याने स्टिरॉईड असलेल्या औषधांचा तसेच टोसिलॅझुमॅबच्या अतिवापरामुळे हा आजार वाढला होता.मात्र,नंतर पालिकेने या औषधांच्या वापरावर नियंत्रण आणल्याने आता नवे रुग्ण सापडण्याचे प्रमाण कमी झाले आहे.‘मुंबईत आता पर्यंत 884 रुग्णांवर उपचार करण्यात आले.त्यातील 264 रुग्ण हे मुंबईतील होते तर 620 रुग्ण हे मुंबई बाहेरील होते.मुंबईत उपचार झालेल्यां पैकी फक्त 30 टक्के रुग्ण हे मुंबईतील होते’, अशी माहिती पालिकेचे अतिरीक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

म्युकरमायक्रोसिस हा डोळ्यात काळ्या रंगाची बुरशी होते.यावर वेळीच उपचार न झाल्यास ही बुरशी मेंदू पर्यंत पोहचते.त्यामुळे रुग्ण दगावण्याचा धोका अधिक असतो.यासाठी वापरली जाणारी औषधेही अत्यंत महागडी आहेत.पालिकेकडे या औषधांचा पुरेसा साठा असल्याचे सांगण्यात आले.

मुंबईतील रुग्णांचा मृत्यूदर 19.69 टक्के

मुंबईतील रुग्णांचा मृत्यूदर 19.69 टक्के आहे.तर,मुंबई बाहेरुन उपचार घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णांचा मृत्यूदर 20.32 टक्के आहे.मुंबई बाहेरील रुग्ण प्रामुख्याने योग्य वेळेत उपचार घेण्यासाठी न आल्याने मृत्यूदर अधिक असल्याचे सांगण्यात आले.

म्युकर मायकोसिस रुग्ण ( मुंबईतील)

एकूण रुग्ण- 262

सक्रिय रुग्ण - 46

आजारावर मात केलेले -166

मृत्यू -52

म्युकर मायकोसिस रुग्ण ( मुंबईबाहेरील)

एकूण रुग्ण - 620

सक्रिय रुग्ण - 89

आजारावर मात केलेले - 405

मृत्यू - 126

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naresh Goyal News : जेट एअरवेजचे चेअरमन नरेश गोयल यांना मोठा दिलासा! अखेर हायकोर्टाकडून जामीन मंजूर

Rohit Sharma IPL 2024 : सुट्टी नाही! मेगा लिलावासाठी रोहितला खेळावेच लागणार... माजी विकेटकिपर कोणते संकेत दिले?

Alyad Palyad: ‘अल्याड पल्याड’ चित्रपटात 'हा' अभिनेता साकारणार सिद्धयोगी साधूची भूमिका; लूकनं वेधलं लक्ष

ICICI Bank: NRI ग्राहकांसाठी आनंदाची बातमी; UPI संदर्भात नवीन घोषणा, जाणून घ्या प्रक्रिया

Latest Marathi News Update: जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना दोन महिन्यांसाठी अंतरिम वैद्यकीय जामीन मंजूर

SCROLL FOR NEXT