mumbai municipal corporation sakal
मुंबई

Mumbai : मुंबई महापालिका २ हजार खासगी सुरक्षा रक्षक नेमणार

सातवेळा मुदतवाढीत १०४ कोटींचा खर्च

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबईत विविध पायाभूत सुविधा प्रकल्पबाधितांसाठी महापालिकेच्या ताब्यात आलेल्या इमारतींसह महापालिका कार्यालये, रुग्णालय आणि प्रसुतीगृहांसाठी गेल्या काही वर्षांपासून एमएमआरडीएच्या खासगी सुरक्षा कंपनीची मदत घेतली जात आहे. याआधीच्या सुरक्षा पुरवणाऱ्या कंपनीला सात वेळा मुदतवाढ देण्यात आली होती. परंतु यापुढे आणखी मुदतवाढ न देता २ हजार सुरक्षा रक्षकांच्या नेमणुकीसाठी निविदा प्रक्रिया येत्या दिवसांमध्ये सुरू होणार आहे.

याआधी २०१५ पासून तीन वर्षांसाठी नियुक्त केलेल्या संस्थांना वारंवार मुदतवाढ देऊन आजपर्यंत त्यांची सेवा घेतली जात आहे. एमएमआरडीकडून सद्यस्थितीला तब्बल दोन हजार खासगी सुरक्षा रक्षकांची मदत घेतली जात असून यापुढे या संस्थांना मुदतवाढ न देता नव्याने सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्याची निविदा मागवण्यात आली आहे. त्यामुळे लवकर नवीन सुरक्षा संस्थांची नियुक्ती करून सुमारे दोन हजार सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्यात येणार आहे.

चेंबूर, मानखुर्द आदी भागांमध्ये एमएमआरडीएने प्रकल्पबाधितांसाठी बांधलेल्या सदनिकांच्या इमारती महापालिकेने सन २०१२मध्ये ताब्यात घेतल्या. परंतु या सदनिकांमध्ये कुठल्याही प्रकारची घुसखोरी होऊ नये म्हणून तत्कालिन पूर्व उपनगराचे अतिरिक्त आयुक्तांनी एमएमआरडीएने नियुक्त केलेल्या सुरक्षा व्यवस्था ही त्याच दर व अटी शर्थीच्या आधारे पुढे कायम ठेवली.

त्यानंतर महापालिकेने ०१ डिसेंबर २०१५ ते ३० नोव्हेंबर २०१८ पर्यंत ईगल सिक्युरिटीज या सुरक्षा संस्थेचे नियुक्ती केली होती.

मुदत संपुष्टात येण्यापूर्वी नवीन संस्थेच्या नियुक्तीकरता निविदा मागवणे आवश्यक होते. परंतु कोविडची लाट येण्यापूर्वीच प्रथम तीन महिने आणि त्यानंतर एक वर्षांची मुदत या सुरक्षा कंपनीला देण्यात आली.

पुढे कोविडच्या नावाखाली ही मुदतवाढ देत आजमितीपर्यंत विनानिविदा या कंपनीला मासिक सव्वा कोटींच्या खर्चाचा भार वाहिला जात आहे.महापालिकेने या प्रकल्पबाधितांच्या सदनिकांमध्ये कोणत्याही प्रकारची घुसखोरी होऊ नये म्हणून या तब्बल ९२५ सुरक्षा अधिकारी व ३० पर्यवेक्षक आदी मनुष्यबळ पुरवण्यासाठी खासगी सुरक्षेसाठी या संस्थेची नियुक्ती केली होती.

सुरक्षा कंपनीला वारंवार तब्बल सात वेळा मुदतवाढ देऊन त्यांना १०४ कोटी रुपये बहाल केले. याशिवाय महापालिका कार्यालये तसेच महापालिकेच्या रुग्णालयांसाठी खासगी सुरक्षा कंपनीच्या माध्यमातून मनुष्यबळ पुरवण्याचे कंत्राट २०१५ पासून देण्यात आले.

यासाठीही सुमारे ११०० खासगी सुरक्षा रक्षकांची सेवाही कंत्राट कालावधीपेक्षा अधिक कालावधीकरता घेतली जात आहे. यासाठीही शंभर कोटींहून अधिक रुपये खर्च करण्यात येत आहे. त्यामुळे यासर्व ठिकाणी नवीन संस्थांची नेमणूक करण्यासाठी निविदा मागवण्यात येत असून दोन हजार खासगी सुरक्षा रक्षक नेमणूक करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

Sachin Ahir: उपसभापतिपदाची प्रतिष्ठा वाढवेन: सचिन अहिर यांची ग्वाही; कष्टकरी, कामगार, महाराष्ट्राशी बांधिलकी सोडणार नाही!

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

सौरऊर्जा मीटर जोडणीच्या ऑर्डरसाठी घेतली ४ हजार रुपयांची लाच; सहायक अभियंत्याला रंगेहात पकडलं...

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

SCROLL FOR NEXT