Mumbai Municipal Corporation esakal
मुंबई

मुंबईतील वाॅर्डनिहाय आरक्षण जाहीर, अनेक दिग्गजांना फटका

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठीची वाॅर्डनिहाय आरक्षण सोडत आज जाहीर झाली आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठीची वाॅर्डनिहाय आरक्षण सोडत आज मंगळवारी (ता.३१) जाहीर झाली आहे. येथील रंगशारदा सभागृहात आरक्षित वाॅर्डांची लाॅटरी पद्धतीने निवड करण्यात आली. या सोडतीत अनेक दिग्गजांना आपला वाॅर्ड गमवावा लागला आहे.

महापालिकेचे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष तथा शिवसेनेचे नेते यशवंत जाधव यांचा वाॅर्ड क्रमांक ११७ हा महिलांसाठी आरक्षित झाला आहे. तसेच अमेय घोले, रवी राजा आणि प्रभाकर शिंदे यांचे वाॅर्डही महिलांसाठी आरक्षित झाले आहेत.

मुंबई महानगरपालिका निवडणूक 2022 करता एकुण 236 वॉर्ड या पैकी ११८ महिलांसाठी आरक्षित

- १५ अनुसूचित जाती (८ महिलांसाठी) प्रभाग क्रमांक : ६०, ८५, १०७, ११९, १३९, १५३, १५७, १६२, १६५, १९०, १९४, २०४, २०८, २१५ आणि २२१ हे अनुसुचित जातीसाठी राखीव

- यापैकी महिलांसाठी राखीव असणारे प्रभाग : ८५, १०७, ११९, १६५, १९०, १९४, २०४ अनुसुचित जाती महिलांसाठी राखीव

- २ अनुसूचित जमाती (१ महिलांसाठी) - प्रभाग क्रमांक ५५, १२४ राखीव, यापैकी १२४ अनुसुचित जमाती महिलांसाठी राखीव

- २१९ वॉर्ड खुले (109 महिलांसाठी)

मनसेच्या नेत्यांचा निवडणुकीचा मार्ग मोकळा

वॅार्ड क्रमांक १९७ आणि २०० सर्वसाधारण झाले आहे. यामुळे मनसेचे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांना आता महापालिका निवडणूक लढवता येणार आहे. गेल्या वेळी वॅार्ड महिलांसाठी आरक्षित झाल्याने संदीप देशपांडे यांच्या पत्नी रिंगणात होत्या. शिवसेनेच्या माजी महापौर विशाखा राऊत यांनी त्यांचा पराभव केला होता. तर संतोष धुरी यांचा अवघ्या काही मतांनी पाडाव झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jagan Mohan Reddy: मोठी बातमी! जगनमोहन रेड्डींच्या पक्षाने 'NDA'च्या सीपी राधाकृष्णन यांना जाहीर केला पाठिंबा

Uttar Pradesh : योगी आदित्यनाथ यांनी गोरखपूरमध्ये केले देशातील दुसऱ्या हरित हायड्रोजन प्रकल्पाचे उद्घाटन

ब्रेकिंग! 18 दिवसांत अतिवृष्टीने राज्यातील ‘या’ जिल्ह्यातील 3.73 लाख हेक्टरवरील पिके भुईसपाट; कृषी विभागाचा नजर अंदाज अहवाल; पंचनामे करण्यास ई-पीक पाहणीची अडचण

MP Nilesh Lanke : श्रीरामपूर-परळी ब्रॉडगेज प्रकल्प पुन्हा सुरू करा; नीलेश लंके यांची रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे मागणी

6,6,6,6,6,6! भारतीय गोलंदाजाची T20 मध्ये १९ चेंडूंत फिफ्टी, आठव्या क्रमांकावर आला धुमाकूळ घातला, नंतर ३ विकेट्सही टिपल्या

SCROLL FOR NEXT