Chhath Puja Festival sakal
मुंबई

Chhath Puja Festival : रामलिला नंतर छटपूजेसाठी पालिकेचा पुढाकार

मुंबई शहरात पहिल्यांदाच नवरात्रोस्तव व छटपूजा या दोन्ही उत्सवांचे संपूर्ण नियोजन महापालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने करणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - मुंबई शहरात पहिल्यांदाच नवरात्रोस्तव व छटपूजा या दोन्ही उत्सवांचे संपूर्ण नियोजन महापालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने करणार आहे. गणेशोस्तवाच्या धर्तीवर ही व्यवस्था केली जाणार आहे. विशेष म्हणजे यावेळी छटपुजेसाठी कृत्रिम तलावापासून सर्व व्यवस्था पालिका उभारणार आहे. मुंबई शहराच्या इतिहासात पहिल्यांदा हा निर्णय घेतल्याचा दावा मुंबई भाजपाकडून करण्यात आला आहे.

या संदर्भात मुंबई उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा आणि मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांच्या उपस्थितीत नवरात्रोत्सव मंडळ आणि छटपूजा आयोजक मंडळ यांची संयुक्त बैठक पालिका मुख्यालयात पार पाडली. या बैठकीत हा निर्णय घेतल्याचे आमदार आशिष शेलार यांच्याकडून सांगण्यात आले.

मुंबई शहरात १२०० हून अधिक नवरात्री मंडळे दरवर्षी अधिकृतरित्या उस्तवासाठी परवानगी घेतात. तसेच मुंबई शहरात ८२ हून अधिक ठिकाणी छटपूजेचे आयोजन केले जाते. या निर्णयाबद्दल सर्व नवरात्रोत्सव मंडळ आणि छटपूजा आयोजक मंडळ यांनी आशिष शेलार मंगलप्रभात लोढा यांचे आभार मानले आहे.

पालिका काय करणार आहे

१. नवरात्रोत्सावासाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या एक खिडकी योजनेमार्फत देणार

२. बिगर व्यावसायिक नवरात्री मंडळासाठी परवानगी शुल्क, अग्निशमन शुल्क माफ केले जाईल.केवळ १०० रुपये अमानत रक्कम आकारणार

३. दुर्गा मूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची व्यवस्था, दिवे, शौचालय,निर्माल्य कलश इ. व्यवस्था

५. छटपूजेसाठी आवश्यक कृत्रिम तलाव, शौचालय, निर्माल्य कलश

६. छटपूजेसाठी महिलांना कपडे बदलण्यासाठी स्वतंत्र कक्षाची सुविधा

७. छटपूजेसाठी सूर्यास्ताच्या वेळी सूर्योदयाच्यावेळी आवश्यक पोलीस बंदोबस्त

८. नवरात्री, रास दांडिया, गरबा आयोजनात महिला सुरक्षेसाठी महापालिका व पोलीस प्रशासन यांच्याकडून जनजागृती बॅनर्स लावण्यात येतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : श्रीवर्धन मधील बोर्ली पंचतन परिसरात एसटीला अपघात

SCROLL FOR NEXT