Mumbai Municipal Corporation to construct seven sewage treatment plants
Mumbai Municipal Corporation to construct seven sewage treatment plants  Sakal
मुंबई

Mumbai : मुंबई महापालिका बांधणार सात मलजल प्रक्रिया केंद्रे

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - मुंबई महानगर पालिकेने मुंबईच्या काही भागात सात मलजल प्रक्रिया केंद्रे बांधण्याचा निर्णय घेतला आहे. या मलजल प्रक्रिया केंद्रांचा आराखडा तयार करण्यात येत असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे.

पालिकेने शंभर टक्के मलनिःसारण वाहिऩ्याच्या सुविधा उपलब्ध करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. मुंबईत सद्या 2045 किलोमीटर इतक्या लांबीचे मलनिःसारण वाहिन्यांचे जाळे आहे. सद्या मुंबईच्या एकूण 74.98 टक्के लोकसंख्येला मलनिःसारण सुविधा पुरविली जाते. मलनिःसारण वाहिन्यांच्या जाळ्यांमध्ये सुधारणा करणे आणि काही ठिकाणी मलवाहिन्या नव्याने टाकण्याला यंदा पालिका प्रशासन वेग देणार आहे.

मात्र सात ठिकाणी मलजल प्रक्रिया केंद्रे नव्याने बांधण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबत प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली. ही कामे यंदा प्राधान्याने घेतलेली आहे. धारावी, मालाड, वर्सोवा, घाटकोपर, भांडूप, वांद्रे, वरळी आदी ठिकाणी मलजल प्रक्रिया केंद्रे आहेत. येते मलजलावर प्रक्रिया होते. यात आणखी नवी सात केंद्रे बांधल्यास पर्यावरणासाठी हिताचे होईल, असा विश्वास पालिका प्रशासनाने व्यक्त केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mayawati: "जोपर्यंत तो पूर्ण..." मायावतींनी तडकाफडकी भाच्याला राष्ट्रीय संयोजक पदावरून हटवले

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 08 मे 2024

ढिंग टांग : अस्सावा सुंदर नोटांचा बंगला..!

दहावी-बारावीनंतरच करा स्पर्धा परीक्षेची तयारी

युरोपचे अवघडलेपण

SCROLL FOR NEXT