मुंबई

मुंबई ते नवी मुंबई विमानतळ मेट्रोने जोडणार 

सकाळवृत्तसेवा

मुंबई, ता. 9 - राज्य सरकारने एमएमआरडीए क्षेत्रात मेट्रोचे मोठे जाळे निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई, नवीन मुंबई आणि ठाण्यात आणखी तीन मार्ग निर्माण करण्यात येणार आहेत. याबाबतचा प्रस्ताव तयार असून, लवकरच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यतेसाठी ठेवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील सार्वजनिक वाहतुकीची गरज लक्षात घेऊन मुंबई महानगर प्रदेश विकास प्रधिकरणाने (एमएमआरडीए) मुंबई आणि नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळांना जोडणारा मेट्रो मार्ग प्रस्तावित केला आहे. याशिवाय वडाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि कल्याण-डोंबिवली-तळोजा असे दोन नवे मेट्रो मार्ग प्रस्तावित आहेत. 

घाटकोपर ते वर्सोवा हा पहिला मेट्रो मार्ग यशस्वी ठरल्यानंतर सरकारने मोठ्या आणि विस्तारित शहरात मेट्रोचे जाळे निर्माण करण्यावर भर दिला आहे. त्यानुसार एमएमआरडीए क्षेत्रासह पुणे, नागपूर शहरात 284 किलोमीटर लांबीच्या 13 मेट्रो प्रकल्पांची कामे सुरू आहेत. 

नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाचा पहिला टप्पा येत्या दोन-तीन वर्षांत पूर्ण होऊन कार्यान्वित होणार आहे. हवाई प्रवास करणाऱ्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन एमएमआरडीएने मुंबई आणि नवी मुंबई विमानतळाला मेट्राने जोडण्याची योजना आखली आहे. जवळपास 35 किलोमीटर लांबीचा हा मेट्रो मार्ग भुयारी असेल. या प्रकल्पासाठी अंदाजे 25 हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. काही महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ठाणे-भिवंडी-कल्याण या मेट्रो मार्गाचे भूमिपूजन करण्यात आले होते. आता या मेट्रो मार्गाला कल्याण-डोंबिवली-तळोजा हा 25 किलोमीटर लांबीचा मेट्रो मार्ग जोडला जाईल. हा मेट्रो मार्ग उन्नत असणार आहे. मुंबईतील वाहतुकीचा समस्या लक्षात घेता वडाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यानच्या 14 किलोमीटर लांबीचा नव्या मेट्रो मार्गावर एमएमआरडीए सध्या काम करत आहे. 

ठाणे मेट्रोचा प्रस्ताव मंजुरीसाठी सादर 
दरम्यान, ठाणे महापालिकेने ठाणे-नवीन ठाणे दरम्यान रिंग मेट्रो रेल्वे प्रस्तावित केली आहे. सार्वजनिक-खासगी सहभागातून उभ्या राहणाऱ्या 24 किलोमीटर लांबीच्या या मेट्रो प्रकल्पाला मान्यता देण्यासाठी ठाणे महापालिकेने आपला प्रस्ताव नगरविकास विभागाला सादर केला आहे. हा प्रस्ताव लवकरच राज्य मंत्रिमंडळ बैठकीत ठेवण्यात येणार असल्याची माहिती नगरविकास विभागाच्या सूत्रांनी दिली. 

खर्चाची गोळाबेरीज.. 
 मुंबई विमानतळ ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ - अंदाजे 25 हजार कोटी 
 कल्याण-डोंबिवली-तळोजा - अंदाजे 7500 कोटी 
 वडाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - 9800 कोटी 
 ठाणे-नवीन ठाणे दरम्यान रिंग मेट्रो - 7200 कोटी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK vs SRH Live IPL 2024 : ऋतुरात शतकाच्या उंबरठ्यावर, सीएसके गाठणार का 200 चा टप्पा

Video : दैव बलवत्तर! छतावरुन कोसळणाऱ्या चिमुकल्याला कसोशीने वाचवलं; व्हिडीओ व्हायरल

Pune Weather Update : बारामतीकरांनी अनुभवला उन्हाळ्यातील सर्वात उष्ण दिवस

Virat Kohli GT vs RCB : मी गेली 15 वर्षे खेळतोय याला काहीतरी... विराट स्ट्राईक रेटवरून बोलणाऱ्यांना दिलं कडक उत्तर

Latest Marathi News Live Update : ...तरीही ममतांनी शेख शाहजहानला संरक्षण देण्याचा प्रयत्न केला- नड्डा

SCROLL FOR NEXT