Mumbai Local  esakal
मुंबई

Mumbai Local: उद्या पश्चिम रेल्वेवर १४ तासांचा ब्लॉक; या गाड्यांवर होणार परिणाम, जाणून घ्या वेळापत्रक

लोकल सेवांवर परिणाम होणार; हार्बरवरील लोकलही रद्द

सकाळ डिजिटल टीम

Mumbai Local: जोगेश्वरी ते गोरेगाव स्थानकांदरम्यान पुलाच्या कामासाठी रविवारी (ता. ४) पश्चिम रेल्वेने १४ तासांचा मेगाब्लॉक घेतला आहे. हा ब्लॉक पश्चिम रेल्वेच्या अप-डाऊन दोन्ही मार्गांवर आणि अप-डाऊन हार्बर मार्गावरही असणार आहे. या दरम्यान अनेक लोकल सेवा रद्द करण्यात येणार असल्याने प्रवाशांचे हाल होणार आहेत.

जोगेश्वरी ते गोरेगाव स्थानकांदरम्यानच्या पूल क्र. ४६ च्या पुनर्गर्भीकरणाच्या कामासाठी शनिवारी (ता. ३) रात्री १२ ते रविवारी दुपारी २ वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे. यामुळे अंधेरी आणि गोरेगाव स्थानकांदरम्यान अप-डाऊन जलद मार्गावरील सर्व लोकल धीम्या मार्गावर चालवल्या जातील आणि फलाट उपलब्ध नसल्यामुळे राम मंदिर स्थानकावर थांबणार नाहीत.

या शिवाय मध्य रेल्वेवरून धावणाऱ्या सर्व हार्बर लोकल सेवा वांद्रे स्थानकापर्यंत चालविण्यात येणार आहेत. चर्चगेट ते बोरिवली स्थानकादरम्यान काही धीम्या लोकल शॉर्ट टर्मिनेट केल्या जातील आणि परतीच्या दिशेने या लोकल अंधेरी स्थानकातून धावणार आहेत.

हार्बर मार्ग

रविवारी दुपारी सीएसएमटी ते गोरेगाव दुपारी १.५२, गोरेगाव-सीएसएमटी १२.५३ ची लोकल रद्द.

शनिवारी रात्री डाऊन हार्बर मार्गावरून सीएसएमटी-गोरेगाव ही शेवटची लोकल १०.५४ वाजता सुटेल.

अप हार्बर मार्गावरील शेवटची लोकल गोरेगावहून रात्री ११.०६ वाजता सुटेल.

ब्लॉक कालावधीत वांद्रे-गोरेगाव अप-डाऊन मार्गावर लोकल सेवा उपलब्ध राहणार नाहीत.

पश्चिम रेल्वे

दुपारी १२.१६ आणि २.५० वाजताची चर्चगेट-बोरिवली लोकल विरारपर्यंत धावणार आहे.

बोरिवलीहून दुपारी १.१४ आणि ३.४० ची चर्चगेट लोकल रद्द असणार आहे.

विरारहून चर्चगेटसाठी दुपारी १.४५ आणि ४.१५ अशा दोन अतिरिक्त जलद लोकल सुटणार.

मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक

उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती, तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी (ता. ४) मध्य रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. हा मेगाब्लॉक ठाणे ते कल्याण अप आणि डाउन जलद मार्गावर, तर ट्रान्सहार्बर मार्गावरील ठाणे ते वाशी/नेरूळ अप आणि डाऊन मार्गावर घेण्यात येणार आहे.

मध्य रेल्वे

कुठे : ठाणे-कल्याण अप आणि डाउन जलद मार्गावर

कधी : सकाळी १०.४० ते दुपारी ३.४० पर्यंत

परिणाम : ब्लॉकदरम्यान सीएसएमटी येथून सुटणाऱ्या जलद लोकल ठाणे-कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गावरून धावतील. या लोकल कळवा, मुंब्रा आणि दिवा स्थानकांदरम्यान थांबतील.

कल्याण येथून सुटणाऱ्या अप जलद लोकल कल्याण-ठाणे स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावरून धावतील. वळवल्या जातील. या गाड्या त्यांच्या वेळापत्रकाच्या थांब्यांव्यतिरिक्त दिवा, मुंब्रा आणि कळवा स्थानकांदरम्यान थांबून पुन्हा अप जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि १० मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचतील.

ट्रान्स हार्बर

कुठे : ठाणे-वाशी/नेरूळ अप आणि डाउन जलद मार्गावर

कधी : सकाळी १०.२५ ते संध्याकाळी ४.०९ पर्यंत

परिणाम : ब्लॉक कालावधीत ठाणे येथून वाशी,पनवेल/नेरूळला जाणाऱ्या डाऊन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. वाशी, पनवेल, नेरूळ येथून ठाणे करीता सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain Alert : मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढचे पाच दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता; ठाणे अन् पालघरलाही सतर्कतेचा इशारा

INDW vs AUSW Live: स्मृती मानधना-शफाली वर्मा यांचा वर्ल्ड रेकॉर्ड! हरमनप्रीत कौरच्या अर्धशतकामुळे ऑस्ट्रेलियासमोर तगडे लक्ष्य

IND vs IRE 2nd T20I : संजू ०, अभिषेक ०... भारतीय संघ संकटात; गोंधळामुळे इशान किशन रन आऊट... JAI MOONDRA पुन्हा चमकला

Vilas Ghule : विलास घुले खून प्रकरणात नवे वळण; दहावा आरोपी लातूरमधून ताब्यात, गुन्ह्यातील स्कॉर्पिओ जप्त

Breaking : बेन स्टोक्सचा धक्कादायक निर्णय! इंग्लंडच्या कर्णधाराने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून जाहीर केली निवृत्ती

SCROLL FOR NEXT