bmc  sakal
मुंबई

Mumbai News: मुंबई होणार चकाचक; शहर अतिक्रमण मुक्त करण्याचे महापालिकेचे मिशन

Chinmay Jagtap

Mumbai News: महापालिकेने आता अतिक्रमणमुक्त मुंबई मिशन हाती घेतले आहे. मुंबईत विविध प्राधिकरणे असून प्रत्येकाने समन्वय साधत अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवावी, असे निर्देश विविध यंत्रणांना दिल्याचे पालिका आयुक्त डॉ. इक्बाल सिंह चहल यांनी सांगितले. अतिक्रमण निर्मूलन मोहिमेदरम्यान पोलिस यंत्रणेने प्राधान्याने बंदोबस्‍त पुरवावा, असे निर्देशही त्यांनी दिले आहेत.

विविध प्राधिकरणांच्‍या पातळीवर होणाऱ्या अतिक्रमण निर्मूलन कारवाईची माहिती व सविस्‍तर तपशील योग्यरीत्या जतन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तपास आणि न्यायालयीन कामकाजासाठी ती महत्त्वपूर्ण ठरते, असे चहल यांनी नमूद केले. ते पुढे म्हणाले, की मुंबईतील विविध शासकीय यंत्रणांच्‍या भूखंडांवर डेब्रिज टाकले जात असल्याने विद्रूपीकरण होत आहे. त्यास आळा घालावा. महापालिका आणि पोलिस यंत्रणेने विविध ठिकाणी सीसीटीव्‍ही बसवावेत. स्‍थानिक पोलिसप्रमुख आणि पालिकेच्या सहायक आयुक्तांनी प्राधान्‍याने लक्ष द्यावे, असे निर्देशही चहल यांनी दिले आहेत.

उच्‍च न्‍यायालयाच्‍या आदेशानुसार राज्य सरकारने स्थापन केलेल्‍या अतिक्रमण निर्मूलन स्थायी समितीची बैठक नुकतीच पालिका मुख्‍यालयात आयुक्त चहल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. अतिरिक्‍त जिल्‍हाधिकारी (अतिक्रमण निर्मूलन) तेजसिंग पवार, म्‍हाडाचे उपायुक्‍त एस. एम. कळंबे, विमानतळ प्राधिकरणाचे सहायक व्‍यवस्‍थापक संजय पाटोळे, सहायक पोलिस आयुक्‍त (पोलिस आयुक्‍त कार्यालय) दौलत साहे, मिठागरे अधीक्षक ए. पी. मोहंती, पालिकेचे सहआयुक्‍त चंद्रशेखर चोरे, उपायुक्त संजोग कबरे, सहायक आयुक्‍त मृदुला अंडे आदी अधिकारी बैठकीस उपस्थित होते.

योग्य समन्वय साधा

पालिका, जिल्‍हाधिकारी कार्यालय, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए), झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (एसआरए), म्‍हाडा, रेल्‍वे, पोर्ट ट्रस्‍ट, विमान प्राधिकरण, मिठागरे इत्यादींसह विविध शासकीय यंत्रणा कार्यरत आहेत. शासकीय संस्‍थांच्‍या भूखंडांवरील अतिक्रमणे हटवण्यासंदर्भात सर्व संबंधित यंत्रणांनी प्रभावी कार्यवाही करणे आवश्यक आहे. येणाऱ्या सणासुदीच्या कार्यकाळात पोलिस प्रशासनाशी योग्यरीत्या समन्वय साधून कारवाई हाती घ्यावी, असे निर्देशही डॉ. इक्बाल सिंह चहल यांनी सर्व संबंधितांना दिले.

अतिक्रमण निर्मूलनाच्या वेळी प्रभावी ठरलेल्या पालिकेकडील माहिती-तंत्रज्ञान प्रणालीचा वापर करण्‍यासाठी इतर शासकीय संस्‍थांनीही पुढाकार घ्‍यावा, असे आवाहनही आयुक्तांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

Food Adulteration Crackdown: अन्न भेसळ पथकाच्या धास्तीने टाकळी राजेरायमध्ये सर्व दुकाने बंद; गुटखा व भेसळयुक्त सुट्या तेलाच्या खुलेआम विक्रीचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT