मुंबई - यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी कृषी, औद्योगिक समाजरचना, व्यवस्थापन, प्रशासन, सामाजिक एकात्मता, विज्ञान-तंत्रज्ञान, ग्रामीण विकास, अर्थिक सामाजिक विकास, मराठी साहित्य, संस्कृती, कला व क्रीडा क्षेत्रामध्ये लक्षणीय कामगिरी करणाऱ्या राज्यातील व्यक्ती, संस्थांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात येणार आहे. यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पारितोषिकाचे यंदाचे मानकरी म्हणून माजी सनदी अधिकारी भुजंगराव कुलकर्णी यांची निवड करण्यात आली आहे. रोख दोन लाख रुपये व मानपत्र असे या पारितोषिकाचे स्वरूप आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते उद्या (ता. 25) संध्याकाळी प्रतिष्ठानच्या मुख्यालयात या पारितोषिकांचे वितरण होणार आहे. कुलकर्णी यांनी त्यांच्या सेवा काळात भूमी सुधारणा (कूळ कायदा), पुणे महानगरपालिका, नागरी विकास व आरोग्य, जलसंपदा, न्हावाशेवा बंदराची संरचना, मराठवाडा विकास योजना, मराठवाडा वैधानिक मंडळ, मागासलेल्या भागाचे सबलीकरण यांसारख्या अनेक शासकीय कार्यक्षेत्रात उल्लेखनीय काम केले आहे. |