Mumbai Water Supply Lakes Level 
मुंबई

Mumbai News : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! पाणी कपातीचं टेन्शन होणार दूर; जाणून घ्या काय आहे तलावांची स्थिती?

Mumbai News : मुंबईत सलग दुस-या दिवशीही जोरदार पाऊस

सकाळ डिजिटल टीम

Mumbai News : मुंबईत आज दुसऱ्या दिवशीही जोरदार पाऊस सुरू होता. गेला महिनाभर दडी मारलेल्या पावसाने शहर परिसरात दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे रस्त्यावरची वाहतूक मंदावल्याने काही ठिकाणी वाहतूक कोंडी झाली. येत्या २४ तासांत आकाश ढगाळ राहून मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रात कालपासून जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे तलावांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. अजून काही दिवस तलाव क्षेत्रांत पावसाचा मुक्काम राहिल्यास तलावांतील साठा वाढून पाण्याची समस्या दूर होईल, असा विश्वास पालिकेच्या जल अभियंता विभागाने व्यक्त केला आहे.

मुंबईत जुलै महिन्यात पुरेसा पाऊस झाला. मात्र पूर्ण ऑगस्ट महिना कोरडा गेला. पावसाळ्याचे दिवस असतानाही उकाडा जाणवला होता, त्यामुळे मुंबईकर पावसाच्या प्रतीक्षेत होते. गुरुवारी दहीहंडी उत्सवाच्या दिवशी पावसाने दमदार हजेरी लावली.

आज दुसऱ्या दिवशीही पावसाचा जोर कायम होता. दरम्यान, ढगाळ वातावरणात गारवाही जाणवल्याने गेल्या काही दिवसांपासून उकाड्याने हैराण झालेले मुंबईकर काहीसे सुखावले. त्यातच पावसामुळे रस्ते वाहतूक मंदावल्याने काही ठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती. रेल्वे वाहतूक मात्र सुरळीत होती. येत्या २४ तासांत आकाश ढगाळ राहणार असून मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

गेल्या दोन दिवसांत अप्पर वैतरणा ११२ मि.मी, मोडकसागर १३५ मि.मी, तानसा १२१ मि.मी, मध्य वैतरणा १०५ मि.मी, भातसा ११९ मि.मी, विहार १३५ मि.मी, तुळशी १०७ मि.मी इतका पाऊस तलाव क्षेत्रात झाल्याची माहिती जल अभियंता विभागाने दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT