मुंबई

आता टॅक्सीवाल्यांकडून होणारी लूट थांबणार, लवकरच वापरली जाणार 'ही' भन्नाट टेक्नॉलॉजि

प्रशांत कांबळे

मुंबई, ता. 16 :  राज्य सरकारने नुकतेच रिक्षा, टॅक्सींची भाडेवाढ केली आहे. अशात आता रिक्षा, टॅक्सीचे मीटर रिकॅलिब्रेशन करण्याची धावपड सुरू आहे. मात्र, विविध कंपन्यांच्या मीटरमध्ये बिघाड करून प्रवाशांची सर्रास आर्थिक लूट केली जाते. त्यामुळे भविष्यात दिल्लीच्या धर्तीवर मुंबईतसुद्धा GPS मीटर लावण्याबाबत प्रशासन विचाराधीन असल्याचे परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांनी सांगितले असून, लवकरच उत्पादक कंपन्यांची बैठक घेतली जाणार आहे.

मुंबई महानगरात चार लाखांपेक्षा जास्त रिक्षा तर 40 हजारांपेक्षा जास्त टॅक्सी आहे. नवीन भाडेवाढीमुळे सध्या या टॅक्सी, रिक्षा चालकांना मीटर रिकॅलिब्रेशन करावे लागणार आहे. यासाठी एका मिटरसाठी एकूण 700 रुपये मोजावे लागतात. ज्या ज्या वेळी भाडेवाढ केली जाईल त्यावेळी मीटर रिकॅलिब्रेशन करण्याच्या कटकटीतून मुक्तता करण्याचा प्रयत्न परिवहन विभागाचा आहे. त्यासोबतच मीटरमध्ये पारदर्शकता सुद्धा आवश्यक असल्याने जीपीएस मीटर उत्तम पर्याय सिद्ध होऊ शकतो.

दिल्लीमध्ये सध्या जीपीएस मीटरचा वापर केला जात असून, रिक्षा, टॅक्सी प्रवाशांना जीपीएस पद्धतीने भाडे आकारात आहे. तर प्रवासी भाड्यात पारदर्शकता वाढली आहे. सध्या मुंबईत जीपीएस मीटर ओला, उबर वाहनांमध्ये वापरण्यात येत आहे. टॅक्सी, रिक्षा मध्ये असे जीपीएस  मीटर लावल्यास प्रवाशांची आर्थिक लूट थांबणार आहे.

सध्या टेरिफ कार्डच्या साहाय्याने भाडेवसुली

रिक्षा, टॅक्सीच्या भाडेवाढीनंतर मीटर रिकॅलिब्रेशन करण्यासाठी 31 मे पर्यंत मुदत राज्य सरकारने दिली आहे. तर 1 मार्च पासून मुंबईत नवीन भाडेवाढ लागू करण्यात आली आहे. मात्र, मीटर अपडेट केले नसल्याने भाडे वसूल करण्यासाठी आणि प्रवाशांच्या माहितीसाठी परिवहन विभागाने टेरिफ कार्ड काढले काढले असून, राज्य परिवहन विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर सुद्धा नवीन भाडेवाढीची आकडेवारी प्रवाशांसाठी उपलब्ध करण्यात आली आहे.

mumbai news GPS based meters will be used in future for keeping transparency between driver and user 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Press : १४ मिनिटांत १२ मतदारांची नावे वगळणाऱ्या सूर्यकांतला राहुल गांधींनी थेट स्टेजवरच आणले...खुलासा ऐकून सगळेच अवाक्

हायड्रोजन बॉम्ब अजून बाकी, इलेक्शन कमिशनमधूनच मिळतेय मदत; राहुल गांधी काय म्हणाले?

Windows 10 : ऑक्टोबर महिन्यांपासून बंद होणार विंडोज 10 चा फ्री सपोर्ट; लाखो वापरकर्त्यांचा डेटा धोक्यात, आता काय करावं? जाणून घ्या

Fake Massege Supreme Court : सर्वोच्च न्यायालयाची बनावट मेसेजद्वारे फसवणूक, अब्दुललाटच्या दोघांवर गुन्हा; का आहे नेमकं प्रकरण?

Baba Adhav : ...अन्यथा राज्यव्यापी जेल भरो आंदोलन, डॉ. बाबा आढाव; माथाडी कायद्यातील दुरुस्त्या मागे घेण्याची मागणी

SCROLL FOR NEXT