मुंबई

कोरोना लसीचे उत्पादन वाढवण्यासाठी हाफकिन स्थापन करणार प्रयोगशाळा

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : सरकारच्या मालकीच्या हाफकिन बायो-फार्मास्युटिकल कॉर्पोरेशन लिमिटेडने संपूर्ण भारतीय बनावटीच्या कोवाक्सिन या कोरोना लसीच्या उत्पादनासाठी केंद्र सरकारकडे बीएसएल -3 दर्जाची प्रयोगशाळा आपल्या कॅम्पसमध्ये सुरू करण्याची परवानगी मागितली आहे. 'कोविड सुरक्षा' मिशन अंतर्गत हाफकिनने मार्चच्या पहिल्या आठवड्यातच आयसीएमआरकडे कोवॅक्सीनच्या उत्पादनाची परवानगी मागितली आहे. केंद्र सरकारने कालच (मंगळवारी) 45 वर्षांवरील नागरिकांना तिसऱ्या टप्प्यात लसीकरणाची परवानगी देऊ केली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी आता लसीचे उत्पादन वाढवण्याची गरज असल्याचं या आधीच बोलून दाखवलं आहे. 

हाफकिन संस्थेने कोवॅक्सीन बनवण्याचं तंत्रज्ञान हस्तांतरित करण्यासाठी भारत बायोटेक या कंपनीकडे परवानगी मागितली आहे. हा प्रकल्प उभारण्यासाठी हाफकिन संस्थेला राज्य सरकारकडून १५४ कोटी तर केंद्र सरकारकडून  ८७ कोटींची आवश्यकता भासणार आहे. 

एकूण दोन टप्प्यांमध्ये हा कार्यक्रम राबवला जाणार आहे. यामधील पहिल्या टप्प्यात भारत बायोटेक या कंपनीकडून लस घेऊन हाफकिनमध्ये केवळ इंजेक्शन भरून ते वितरित करण्यावर प्राधान्य राहणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यात हाफकिन संस्था भारत बायोटेककडून टेक्नॉलॉजि घेऊन स्वतःच  लसीचे उत्पादन सुरु करणार आहे . या टप्प्याला पूर्ण होण्यास तब्बल दीड वर्षांचा कालावधी लागणार आहे. 

याबाबत बोलताना हाफकिन संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक संजय राठोड म्हणालेत की, "सुरवातीच्या टप्प्यात झालेल्या चर्चेनुसार जर कंपनीने आम्हाला कच्चा माल पुरवला तर आम्ही वर्षाला १२.६ कोटी लसी बनवू शकतो. सोबतच नवीन प्रयोगशाळा तयार झाल्यास हीच संख्या वर्षाला वाढून २२८ कोटींवर देखील नेली जाऊ शकते. 

mumbai news haffkine now plans lab to scale up vaccination production

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुण्यात एकाच वेळी दोघांनी संपवले जीवन, तरुण-तरुणीचे मृतदेह सापडले, घटनेने खळबळ

Latest Marathi News Updates : विजेचा धक्का लागून शेतकऱ्यासह दोन बैलांचा मृत्यू

Mumbai Politics: पलावात आमदारांनी घर घ्यावे, म्हणजे उठलं की जाता येईल, ठाकरे गटाचा शिंदेसेनेच्या आमदारांना टोला

"माझ्या नवऱ्याचे विवाहबाह्य संबंध" पंचायत फेम अभिनेत्यावर पत्नीने केलेले गंभीर आरोप

Demat Account: शेअर बाजाराची क्रेझ कमी होत आहे का? डीमॅट अकाउंट बंद करण्याचे प्रमाण वाढले, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT