मुंबई

कोर्टाने दिला नकार, "मुलाचा ताबा जन्मदात्या आई वडिलांना दिला जाऊ शकत नाही"; नक्की झालं काय होतं?

- सुनीता महामुणकर

मुंबई, ता. 2 : मुलाच्या भविष्याचा विचार करून त्याचा ताबा जन्मदात्या आई वडिलांपेक्षा त्याच्या दत्तक आणि आर्थिकदृष्ट्या उत्तम असलेल्या आईवडिलांना देणे संयुक्तिक ठरेल, असे निरीक्षण नोंदवून मुंबई उच्च न्यायालयाने मुलाचा ताबा सख्या आई वडिलांना देण्यास नकार दिला.

सहा वर्षापूर्वी मुलाचा जन्म झाल्यानंतर दोन दिवसांनी त्याला त्याच्या आई वडिलांनी दत्तक दिले होते. त्यानंतर तो दत्तक पालकांकडेच असून भावनिकरित्या त्यांच्याशी जुळला आहे, त्यामुळे आता त्या संरक्षित वातावरणातून बाहेर नेऊ नये, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले आहे. तसेच जन्मदाते वडील रिक्षा चालक आहेत आणि त्यांना पहिल्या पत्नीपासून दोन मुली आहेत. तर दत्तक वडील व्यापारी असून दत्तक आई डॉक्टर आहे.

त्यामुळे दत्तक घरात मुलाचे संगोपन, शिक्षण, जडणघडण अत्यंत योग्य प्रकारे सुरू आहे. मुलगा त्याच्या दत्तक आई वडिलांबरोबर मानसिक भावनिक रित्या एकरूप झाला आहे आणि पालकही त्याची काळजी घेत आहेत, त्यामुळे जन्मदात्या पालकांपेक्षा मुलगा दत्तक घरात अधिक सधन परिस्थितीमध्ये असून भविष्याच्या दृष्टीने त्यांच्याकडे राहणे योग्य आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे.

मुलाचे वडील रिक्षा चालक असून विवाहित आहेत. त्यांना अन्य मुलीशी असलेल्या प्रेमसंबंधातून या मुलाचा जन्म झाला. मात्र जन्माला आल्यावर दुसऱ्याच दिवशी ते रुग्णालयातून बाहेर पडले. परंतु लग्न न झाल्यामुळे मुलाला घेऊन आई स्वतःच्या घरी जाऊ शकत नव्हती. त्यामुळे त्यांनी मुलाला लगेच दुसऱ्या दिवशी दत्तक दिले. विशेष म्हणजे मुलाला जन्मानंतर कावीळ झाली होती. मात्र दत्तक पालकांनी त्याचे योग्य उपचार केलेत. दत्तक पालकांना मूलबाळ नाही. त्यांनी या मुलाचे स्वतःच्या मुलासारखे पालन केले आहे.

काही वर्षानी संबंधित अविवाहित तरुणी आणि रिक्षावाले वडील यांनी एकत्र राहायचे ठरवले आणि ती त्याच्या कुटुंबासह राहू लागली. तसेच त्यानंतर तीला एक मुलगीही झाली. संपूर्ण कुटुंब एक झाल्यामुळे त्यांनी दत्तक मुलगा पुन्हा मिळण्यासाठी नागपूर कुटुंब न्यायालयात दावा दाखल केला. मात्र हा दावा न्यायालयाने नामंजूर केला आणि ताबा दत्तक पालकांना दिला. त्यामुळे जन्मदाते पालकांनी मुंबई हायकोर्टमध्ये याचिका केली.

न्या ए एस चांदुरकर आणि न्या एन बी सूर्यवंशी यांच्या खंडपीठाने ही मागणी अमान्य केली. मुलाच्या उज्वल भविष्यासाठी दत्तक पालकच योग्य आहेत असे पुरावे दाखल आहेत, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

mumbai news high court dismissed case filed to get custody of their biological baby

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT