मुंबई

लोकल सेवा सुरू झाल्याचा परिणाम, आठवड्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ

मिलिंद तांबे

मुंबई: सर्वसामान्यांसाठी रेल्वे सुरू झाल्याने रेल्वेतील गर्दी वाढली आहे. कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढल्याचे दिसते. गेल्या 10 दिवसात मुंबईत 4237 रुग्णांची भर पडली असून रुग्ण संख्या वाढल्यास रेल्वे प्रवाशांवर निर्बंध आणण्याचे संकेत पालिका प्रशासनाने दिले आहेत. 

मुंबईत 1 फेब्रुवारी पासून सर्वसामान्यांसाठी रेल्वे प्रवास सुरु झाला. बघता बघता रेल्वेतील गर्दी वाढू लागली. सीएसएमटी, दादर,कुर्ला,चर्चगेट सारख्या स्थानकांवर पूर्वी प्रमाणे प्रवाशांची रेटारेटी सुरू झाली. परिणामी नियंत्रणात आलेला कोरोना संसर्ग वाढण्याची भीती निर्माण झाली आहे.

सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरू होण्याआधी म्हणजे 1 फेब्रुवारी रोजी दिवसभरात केवळ 328 नवे रुग्ण आढळले होते तर एकूण रुग्णांची संख्या 3,08,969 इतकी होती. त्यात दिवसेंदिवस वाढ होत गेल्याचे दिसते. 2 फेब्रुवारीला 334,  3 फेब्रुवारीला 503 नवे रुग्ण सापडले.

गेल्या आठवडयाभरात दैनंदिन आढळणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असून 10 फेब्रुवारी 558 नवे रुग्ण सापडले असून एकूण रुग्णांची संख्या 3,13,206 इतकी झाली आहे. लोकल सेवा सुरू झाल्यापासून रुग्णसंख्येत 4,237 नव्या रुग्णांची भर पडली आहे. 

लोकल सेवा सुरू होण्याआधी मुंबईतील रुग्ण दुपटीचा दर ही मोठ्या प्रमाणात वाढला होता. 31 जानेवारी तसेच 1 फेब्रुवारी ला रुग्ण दुपाटीचा दर हा 564 दिवसांवर गेला होता. गेल्या आठवड्याभरात रुग्ण दुपटीच्या दरात 9 दिवसांची घट झाली असून 10 फेब्रुवारी रोजी तो 555 दिवसांवर आला आहे. रुग्ण दुपटीचा दर कमी झाल्याचे दिसते. 

मुंबईतील रुग्णसंख्येत वाढ झाली असली तरी मृत्यूंची संख्या मात्र काहीशी नियंत्रणात आल्याचे दिसते. गेल्या आठवड्यापर्यंत दैनंदिन 7 ते 8 मृत्यू होत होते. ते आता कमी होत 3 ते 4 पर्यंत खाली आले आहेत. गेल्या चार दिवसांपासून मृत्यूचा आकडा 4 च्या खाली आहे.

लोकलसेवेमुळे कोविडचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढले असे म्हणता येणार नाही. ही वाढ धोकादायक असल्याचे दिसत नाही. मात्र पूर्णवेळ लोकल सुरु करण्यासाठी पुढील 10-12 दिवस मुंबईसह महामुंबईतील कोविड रुग्णाच्या आकडेवारीचा अंदाज घ्यावा लागणार आहे. रुग्णसंख्या नियंत्रणात असली किंवा आता पेक्षा कमी असली तर लोकल सेवा सुरु करण्यास हरकत नसेल. मात्र रुग्णवाढ झाल्यास लोकल सेवेबाबत विचार करावा लागेल.
सुरेश काकाणी,अतिरीक्त आयुक्त मुंबई महानगर पालिका

दैनंदिन रुग्ण (1 फेब्रु)- 328
दैनंदिन रुग्ण (10 फेब्रु) - 558
एकूण रुग्णसंख्या - 3,13,206
आठवड्याभरात वाढलेले रुग्ण -4,237
रुग्ण दुपटीचा दर (1 फेब्रु) - 564 दिवस
रुग्ण दुपटीचा दर (10 फेब्रु) - 555

------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Mumbai News local train start infected corona patients increased

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT