Health 
मुंबई

फक्त लॉकडाउनच्या चर्चेने मुंबईकरांच्या आरोग्यावर हे 'साईड इफेक्ट'

सकाळवृत्तसेवा

मुंबईत एकाबाजूला कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय. त्याचवेळी दुसऱ्याबाजूला कोरोनाचे साईड इफेक्टही दिसू लागले आहेत. सतत कोरोना आणि लॉकडाउनच्या चर्चेचा नागरिकांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होत आहे. मागच्यावर्षी करोनाचा फैलाव रोखण्यासाठी लॉकडाउन करण्यात आला. या लॉकडाउनचे चटके सर्वसामान्यांनी सहन केले आहेत. अनेकांचे उद्योग-व्यवसाय बंद झाले. लोकांनी नोकऱ्या गमावल्या. घराबाहेर पडता येत नसल्यामुळे नागरिकांच्या मनात एकटेपणाची भावना निर्माण झाली. सध्या जी परिस्थिती आहे, त्यामुळे चिंता आणि नैराश्यामध्ये गेलेल्या रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. मुंबईतील मानसोपचारतज्ज्ञांनी हे निरीक्षण नोंदवले आहे.  १७ फेब्रुवारीपासून मुंबईत दररोज ७०० पेक्षा जास्त करोना रुग्ण आढळून येत आहेत. अलीकडे तर दिवसाला हजारपेक्षा जास्त रुग्णांची नोंद होत आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्याच्या तुलनेत सध्या अ‍ॅक्टिव्ह करोना रुग्णांचे प्रमाण ८९ टक्क्याच्या घरात आहे. इतक्या मोठया प्रमाणावर करोना रुग्णांची संख्या वाढल्यामुळे पुन्हा लॉकडाउन होईल, अशी चर्चा आहे. लॉकडाउनच्या या चर्चेचा नैराश्य, चिंता अशा आजाराचा इतिहास असलेल्या रुग्णांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होत आहे. 

"आणखी एका लॉकडाउनच्या विचारानेच माझी झोप उडाली आहे. मनाला घोर लागून राहिला आहे. मागच्यावर्षी मार्च महिन्यात लॉकडाउन जाहीर झाल्यानंतर माझा व्यवसाय ठप्प झाला. सप्टेंबर २०२० मध्ये परवानगी दिल्यानंतर व्यवसाय थोडा पूर्वपदावर आला" असे बोरिवलीत राहणाऱ्या एका रहिवाशाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. 

"२०१८ साली मी ५६ लाखांना फ्लॅट विकत घेतला. त्यासाठी मी दर महिन्याला ३६ हजार रुपये हप्ता भरायचो. माझा व्यवसाय चांगला चालला होता. लॉकडाउनमुळे माझे १५ लाखाचे नुकसान झाले. आता व्यवसाय पूर्वपदावर आलेला असताना लॉकडाउनच्या भीतीने मला रात्रीची झोप लागत नाही" असे बोरिवलीतील या उद्योजकाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. चिंतेचा हा आजार दूर करण्यासाठी मानसोपचारतज्ञाची मदत घेणार असल्याचे त्याने सांगितले. 

"करोना रुग्णांची संख्या कमी झाल्यानंतर करोना आता संपला असे नागरिकांना वाटले होते. पण पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागली आहे. त्यामुळे नागरिकांची चिंता सुद्धा वाढत आहे. अनेकांना नोकरी गमावण्याची भीती वाटत आहे" असे एका मानसोपचारतज्ञाने सांगितले.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

Food Adulteration Crackdown: अन्न भेसळ पथकाच्या धास्तीने टाकळी राजेरायमध्ये सर्व दुकाने बंद; गुटखा व भेसळयुक्त सुट्या तेलाच्या खुलेआम विक्रीचा पर्दाफाश

Mumbai News: उलट्यांचा भीषण परिणाम! दोन महिने वेदना, अखेर जीवदान; आधुनिक उपचारांनी अन्ननलिकेचे छिद्र भरले

Fishing Ban: महाराष्ट्रात मासेमारी बंदीचा कालावधी वाढला! सरकारचा मोठा निर्णय; आता किती दिवस बंदी राहणार? जाणून घ्या...

कर्जत, लोणावळा अलिबागमध्ये आमचे १०० पेक्षा जास्त बंगले; मराठी अभिनेत्री आहे कोट्यवधींची मालकीण, कसा सांभाळते बिझनेस?

SCROLL FOR NEXT