Mamata Room 
मुंबई

Mumbai News : सात रेल्वे स्थानकांत १३ ठिकाणी ‘ममता कक्ष’ सुविधा!

सकाळ वृत्तसेवा

मुंबई :रेल्वे स्थानकांवर आपल्या तान्ह्या बाळाला दूध पाजताना महिला प्रवाशांची होणारी कुचंबणा टाळण्यासाठी मध्य रेल्वेने नॉन फेअर रेव्ह्युन्यू (एनएफआर) अंतर्गत मुंबई विभागाच्या ७ रेल्वे स्थानकांत १३ ठिकाणी ‘ममता कक्ष’ उभारण्यात येत आहे.

स्तनपान करणाऱ्या महिलांसाठी त्यांच्या प्रवासादरम्यान सुरक्षित आणि आरामदायक क्षेत्र निर्माण करण्यासाठी, मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिणस , दादर (तीन ), लोकमान्य टिळक टर्मिनस (तीन), ठाणे (दोन), कल्याण, पनवेल आणि लोणावळा (दोन) असे १३ ‘ममता कक्ष’

बसविण्यात येत आहे. हा प्रकल्प नवीन आणि नाविन्यपूर्ण भाडे व्यतिरिक्त (नॉन फेअर) रेव्हेन्यू आयडियाज स्कीम' अंतर्गत करण्यात आला आहे. हे कंत्राट मेसर्स बुलस आय मीडिया प्रायव्हेट लिमिटेडला देण्यात आले असून २७ डिसेंबर २०२२ च्या स्वीकृती पत्र अंतर्गत ६० हजार रुपये प्रति नर्सिंग पॉड आणि २ वर्षांचा करार कालावधी करण्यात आल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले.

अशी असणार सुविधा

'ममता कक्ष' ही उपरोक्त स्थानकांवर एक प्रवासी सुविधा आहे. जी प्रवास आणि ट्रेन बदल करण्याच्या दरम्यान प्रतिक्षा कालावधीत बाळांच्या आहारासाठी सुरक्षित, मोफत, स्वच्छतापूर्ण जागा प्रदान करेल. ममता कक्षाचा वापर विनामूल्य असेल तसेच नर्सिंग पॉड्समध्ये प्रदान केलेल्या डायपर चेंजिंग स्टेशनची सेवा/वापर देखील विनामूल्य असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT