मुंबई

म्हाडा सोडतीतील विजेते घरांच्या प्रतीक्षेत

सकाळवृत्तसेवा

"ओसी' नसताना घेतलेल्या रकमेवर व्याज देण्याची मागणी
मुंबई - म्हाडाच्या मुंबई मंडळामार्फत 2015 मध्ये काढण्यात आलेल्या सोडतीतील मालाडमधील मालवणी येथील घरांना अद्यापही "ओसी' (भोगवटा प्रमाणपत्र) मिळालेली नाही. काही विजेत्यांकडून घरांची संपूर्ण रक्कम स्वीकारल्यानंतरही म्हाडाने विजेत्यांना ताबा दिलेला नाही. यामुळे विजेत्यांना बॅंकेचा हप्ता आणि सध्या राहत असलेल्या घराचे भाडेही भरावे लागत आहे. घराचा ताबा देईपर्यंत घेतलेल्या रकमेचे व्याज म्हाडाने द्यावे, अशी मागणी लाभार्थी करत आहेत.

मुंबई मंडळाने 2015 मध्ये मालवणी येथील अत्यल्प उत्पन्न गटातील 224 घरांची सोडत काढली. या सोडतीतील विजेत्यांची पात्रतानिश्‍चिती झाल्यानंतर सुमारे 170 जणांना घराची रक्कम भरण्याचे पत्र पाठवले होते. काही विजेत्यांनी घरांची सर्व रक्कम भरली आहे. काही जणांनी सुमारे 80 टक्के रक्‍कम भरली आहे. 100 टक्के रक्कम भरल्यानंतर म्हाडाने विजेत्यांना घराचा ताबा देणे आवश्‍यक होते; मात्र आजही विजेत्यांना ताबापत्र देण्यात आलेले नाही. विजेत्यांनी याबाबत म्हाडा अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता, त्यांना येथील घरांना अद्याप "ओसी' मिळालेली नाही, असे सांगण्यात येत आहे.

नोटाबंदीच्या काळातही म्हाडाने रक्कम भरण्यासाठी मुदतवाढ दिली नाही. एकदोन दिवस विलंब झाल्यानंतरही दंडाची रक्‍कम मात्र वसूल केली. म्हाडा नियमांवर बोट ठेवून कारभार करत असेल, तर "ओसी' नसताना आमच्याकडून संपूर्ण रक्कम का घेतली, असा सवाल लाभार्थी करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अमिताभच्या ‘डॉन’चा दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड! चंद्र बरोट यांचं निधन, फुफ्फुसाच्या आजाराशी सात वर्षांची झुंज संपली!

Gutka Smuggling: पावणेचार लाखांच्या गुटख्यासह १३ लाखांचा ऐवज जप्त

Amravati News: लाभार्थ्याचे अनुदान दुसऱ्याच्याच खात्यात जमा; अमरावती जिल्ह्यात घरकुल योजनेतील प्रकाराकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Gondia Accident: आमदार फुकेंच्या ताफ्यातील वाहनाची दुचाकीला धडक; चालकाचा मृत्यू, हिरडामाली येथील घटना, काही काळ तणाव

Hand Health Signs: हात देत आहेत शरीरातील आजारांचे संकेत? हे 6 बदल लगेच ओळखा आणि त्यावर उपाय जाणून घ्या

SCROLL FOR NEXT