मुंबई

मनसेच्या आंदोलनाचा फज्जा

सकाळवृत्तसेवा

तुर्भे - घंटागाडी कामगारांनीच संपाची हवा काढल्याने मनसेच्या आंदोलनाचा सोमवारी फज्जा उडाला. त्यामुळे ऐरोलीत कचरा वाहतूक करणाऱ्या दोन वाहनांची तोडफोड करून कामगारांना संपात सहभागी होण्यासाठी जबरदस्ती करण्यात आली. या घटनेत एक कामगार जखमी झाला असून त्याच्या डोळ्याला आणि हाताला दुखापत झाली आहे. मनसेच्या कामगार सेनेने आजपासून दोन दिवस काम बंद आंदोलन पुकारले होते. ते शंभर टक्के यशस्वी झाल्याचा दावा संघटनेने केला आहे. प्रत्यक्षात मात्र यात अनेक कामगार सहभागी झाले नसल्याचे चित्र दिसत होते. आंदोलनात सहभागी होण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचा आरोप कामगारांनी केला आहे. मनसेचे हे आंदोलन म्हणजे स्टंटबाजी असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. आंदोलनाची पूर्वसूचना दिली नसल्याने आम्ही त्यात सहभागी झालो नाही, असे या कामगारांनी सांगितले.

घंटागाडी कंत्राटी कामगारांना किमान वेतनातून वगळल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या नेतृत्वाखाली सोमवारी ऐरोली, कोपरखैरणे व बेलापूर येथे या कामगारांनी ठिय्या आंदोलन सुरू केले. मात्र पालिकेच्या अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीत किमान वेतन देण्याबाबत कचरा वाहतूक कंत्राटदाराला निर्देश देण्यात येतील, असे लेखी आश्‍वासन मिळाल्यानंतर त्यांनी हा संप मागे घेतल्याचे जाहीर केले.

नवी मुंबई महापालिकेत शेकडो कंत्राटी कर्मचारी आहेत; परंतु आजतागायत त्यांच्यासाठी पालिकेने सहकार्याची भूमिका घेतलेली नाही. या कामगारांना सेवेत कायम करा, समान काम समान वेतनाची अंमलबजावणी आदी मागण्यांसाठी कामगार संघटना पाठपुरावा करत आहेत; परंतु त्याकडे लक्ष दिले जात नाही. घंटागाडी कंत्राटी कामगारांना किमान वेतनातून वगळले आहे. त्याविरोधात त्यांनी सोमवारी ठिय्या आंदोलन सुरू केले होते; परंतु हे आंदोलन सुरू झाल्यानंतर पालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत संघटनेच्या शिष्टमंडळाची बैठक झाली. त्यात उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाच्या अधिसूचनेनुसार डिसेंबर २०१७ पासून किमान वेतन देण्याचे कचरा वाहतूक कंत्राटदारास निर्देश देण्यात येतील, असे लेखी आश्‍वासन त्यांनी दिले. त्यानंतर हे आंदोनल मागे घेऊन घंटागाडी कर्मचाऱ्यांनी कचरा उचलण्यास सुरुवात केली. दरम्यान, ऐरोलीत कचरा वाहतूक करणाऱ्या दोन वाहनांची तोडफोड करण्यात आली. 

मनसेच्या आंदोलनाला हिंसक वळण लागावे यासाठी कंपनी व्यवस्थापनाच्या गुंडांनीच वाहनांची तोडफोड केली.
- राजेश उज्जैनकर, उपाध्यक्ष, मनसे कामगार सेना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे का पोहचल्या अजित पवारांच्या निवासस्थानी? भेटीमागे नेमकं काय दडलंय?

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : महाराष्ट्रात 11 वाजेपर्यंत 18.18 टक्के मतदान; बारामतीमध्ये सर्वात कमी मतदानाची नोंद

Lok Sabha 2024: बारामतीत मोठा घोळ! बँकांचं पासबुक ओळखपत्र म्हणून न स्विकारण्याच्या सूचना; काय आहे प्रकरण?

EVM वर कमळाचं फुलं दिसत नसल्याने आजोबा संतापले...बारामती मतदारसंघात नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : दिल्लीतील फास्ट फूडची दुकाने आगीत जळाली

SCROLL FOR NEXT