Gangaram-Gavankar
Gangaram-Gavankar 
मुंबई

नाट्य परिषदेच्या दोन्ही पॅनेलला शुभेच्छा - गवाणकर

सकाळवृत्तसेवा

मुंबई - नाट्य परिषदेच्या निवडणुकीत माजी नाट्य संमेलनाध्यक्ष गंगाराम गवाणकर यांनी मोहन जोशी पॅनेलला पाठिंबा दिल्याचा संदेश वॉट्‌सऍपवर फिरत आहे. त्या संदर्भात गंगाराम गवाणकर यांनी थेट पत्रकच काढून दोन्ही पॅनेलला पाठिंबा आणि शुभेच्छा असल्याचे म्हटले आहे.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या निवडणुकीसाठी 4 मार्चला मतदान होणार आहे. परिषदेचे माजी अध्यक्ष मोहन जोशी यांचा अर्ज बाद झाला असला, तरी दीपक करंजीकर व सहकारी हे मोहन जोशी पॅनेल नावानेच निवडणूक लढवत आहेत. या प्रचाराच्या रणधुमाळीत दोन दिवसांपासून मोहन जोशी यांच्या पॅनेलला माजी संमेलनाध्यक्ष गंगाराम गवाणकर यांनी पाठिंबा दिला असल्याचा संदेश फिरत आहे.

अध्यक्षपदाचे उमेदवार प्रसाद कांबळी हे मच्छिंद्र कांबळी यांचे पुत्र आहेत. गंगाराम गवाणकरांनी लिहिलेल्या आणि मच्छिंद्र कांबळी यांची निर्मिती असलेल्या "वस्त्रहरण' या नाटकाने अनेक विक्रम केले होते. त्यामुळेच वॉट्‌सऍपवर गवाणकर यांचा जोशी पॅनेलला पाठिंबा अशा आशयाचा संदेश फिरू लागल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या.

नाट्यनिर्माता संघाच्या अध्यक्षपदावरूनही वाद?
प्रसाद कांबळी व भरत जाधव हे नाट्यनिर्माता संघाचे सदस्य नसल्यामुळे त्यांचे अर्जच बाद व्हायला हवे होते. मात्र तसे न होता प्रसाद कांबळी हे थेट अध्यक्षपदी विराजमान झाले. संबंधित वाद हा धर्मादाय आयुक्तांकडे सुनावणीसाठी गेला असल्याचे पत्र वॉट्‌सऍपच्या माध्यमातून विविध ग्रुपवर प्रसारित झाले आहे. नेमके निवडणुकीच्याच तोंडावर हे पत्र का प्रसारित झाले, अशी चर्चा सध्या नाट्यकर्मींमध्ये रंगली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT