मुंबई

नवी मुंबईचा आज अर्थसंकल्प

सकाळवृत्तसेवा

नवी मुंबई - राज्यातील श्रीमंत महापालिकांपैकी एक असा नावलौकिक असलेल्या नवी मुंबई महापालिकेचा २०१८-१९ चा अर्थसंकल्प उद्या (ता. २०) सादर होणार आहे. तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पावेळी त्यांना बोलू न दिल्यामुळे अर्थसंकल्प चांगलाच गाजला होता. तसेच अर्थसंकल्पातील तरतुदींना विरोध झाल्यानंतर यंदा आयुक्त डॉ. एन. रामास्वामी हे अर्थसंकल्पातून नवी मुंबईकरांना काय देणार, याची उत्सुकता सर्व नागरिकांना लागली आहे.  

गेल्या वर्षी तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सुमारे दोन हजार ८०० कोटींचा अर्थसंकल्प मांडला होता. यात मुंढेंनी मालमत्ता कर व पाणीपट्टी, स्थानिक स्वराज्य संस्था करासह इतर करांच्या आधारावर आत्तापर्यंतचा सर्वात मोठा अर्थसंकल्प मांडला होता. यात पाणीपट्टीतील वाढीव कररचना स्थायी समिती व महासभेने फेटाळून लावली होती. 

नगररचना विभागात मालमत्ता हस्तांतर करताना आकारले जाणारे तडजोड शुल्क स्थायी समितीने फेटाळले होते. पाणी बिलातील वाढीव दरही स्थायी समितीने अमान्य केले होते. यामुळे मुंढेंच्या महत्त्वाकांक्षी अर्थसंकल्पाला कात्री लागली होती; मात्र यंदाच्या अर्थसंकल्पातील भरीव तरतुदींनुसार विकासकामे कमी झाल्याने महापालिकेच्या तिजोरीत तब्बल एक हजार कोटींची शिल्लक आहे. 

परंतु गेल्या वर्षीप्रमाणे चालू वर्षी तिजोरीतील अधिक रक्कम महापालिकेच्या विकासकामांवर खर्च व्हावी यावर रामास्वामी यांनी भर दिला आहे. यंदाच्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात मालमत्ता कर जैसे थे राहण्याची शक्‍यता आहे. रामास्वामी महापालिकेत येण्याआधी त्यांची सेवा मुद्रांक शुल्क विभागात झाली आहे. त्यांनी त्याविभागात अनेक महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. त्यामुळे त्यांच्या माध्यमातून नवी मुंबईकरांच्या पदरात काय पडेल याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. 

अर्थसंकल्पावर चर्चा होणार
रामास्वामी यांच्या वतीने मंगळवारी स्थायी समितीसमोर अंदाजपत्रक सादर होणार आहे. या अंदाजपत्रकावर सखोल चर्चा झाल्यानंतर ते मंजूर होऊन नंतर अंतिम मंजुरीसाठी महासभेच्या पटलावर सादर केले जाईल. त्याठिकाणीही अर्थसंकल्पावर चर्चा होऊन मंजूर करण्यात येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Pune Visit : सुरेश कलमाडींनी पुण्यात पंतप्रधानांना चप्पल फेकून मारली अन्...

MDH Everest Spices: एमडीएच आणि एव्हरेस्ट मसाल्यांवर मालदीवनेही घातली बंदी; कंपनीने दिले स्पष्टीकरण

IPL 2024 : थाला फॉर अ रीजन! धोनीसाठी पठ्ठ्याने गर्लफ्रेंडसोबत केला ब्रेकअप; पोस्टरचा सोशल मीडियावर धुमाकूळ

Mumbai Local News : रुळावरून घसरली CSMT लोकल; रेल्वे वाहतूक ठप्प ! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी प्रवाशांचे प्रचंड हाल !

PM Modi : 'सामान्य नागरिकाच्या घराचं वीज बिल शून्यावर आणणं माझं ध्येय'; पंतप्रधान मोदींनी सांगितला फ्युचर प्लॅन

SCROLL FOR NEXT