मुंबई

कांद्याचे भाव घसरले

सकाळवृत्तसेवा
नवी मुंबई - कांद्याची निर्यात कमी झाल्यामुळे घाऊक बाजारात कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्याच्या परिणामी कांद्याचे भाव घसरले असून, कांदा प्रतिकिलो पाच रुपयांनी स्वस्त झाला आहे. सध्या बाजारात 35 ते 40 रुपये किलोने मिळणारा कांदा 30 ते 35 रुपये किलोवर पोचला आहे. दरम्यान, सध्या नियमितपणे बाजारात कांद्याची आवक होत असल्याने कांद्याचे दर आणखी घसरण्याची शक्‍यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे. त्यामुळे कांद्याच्या दरवाढीमुळे किचनचे बिघडलेले 'बजेट' पुन्हा पूर्वपदावर येणार आहे. वाशीतील घाऊक कांदा-बटाटा बाजारात दररोज 120 ते 125 गाड्या कांद्याची आवक होते; मात्र शनिवारी बाजारात 140 गाड्या कांदा आला. त्यामुळे बाजारात कांद्याचे भाव किलोमागे पाच रुपयांनी घसरले. सध्या नव्या कांद्याची आवक सुरू झाली असून, हळूहळू आवक वाढल्यानंतर जानेवारीपर्यंत कांद्याचे दर पूर्वपदावर येण्याची व्यापाऱ्यांना अपेक्षा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Weather Update : मतदानाच्या दिवशी पावसाची शक्यता; पुढील चार दिवस दुपारनंतर ढगाळ हवामानाचा अंदाज

Watch Video: "घरात बसून कोणाचे चांगले होणार नाही," कॅलिफोर्नियातील 83 वर्षीय आजींनी मतदानासाठी थेट गाठली बारामती

Thane News: आनंद दिघेंच आनंद आश्रमच मुख्यमंत्री शिंदेंनी हडपल, राऊतांचा थेट आरोप

Arvind Ltd. : अरविंद लिमिटेडच्या शेअर्सकडून गुंतवणुकदारांना छप्परफाड कमाई, एका वर्षात 200% वाढ...

Latest Marathi News Live Update : शिवाजी पार्कमध्ये सभा घेण्यासाठी मनसे, ठाकरे गटाचा अर्ज

SCROLL FOR NEXT