school press conference
school press conference  
मुंबई

आर.एम.भट्ट हायस्कूलच्या शताब्दी वर्षात माजी विद्यार्थ्यांची गुरु दक्षिणा

दिनेश चिलप मराठे

मुंबई - मुंबईतील कामगार वस्तीत असलेल्या सुप्रतिष्ठित आर.एम. भट उच्च माध्यमिक शाळेच्या शताब्दी वर्ष सोहळ्या निमित्त येत्या 25 आणि 26 नोव्हेंबर ला NCC डे भव्य प्रमाणात साजरा करण्यात येणार असल्याची माहिती प्रेस क्लब येथे 'गुरु दक्षिणा' या माजी विद्यार्थी संघाच्या अध्यक्षा प्रतिमा जोशी यांनी पत्र परिषदेत दिली.या वेळी शाळेच्या मुख्याध्यापिका गुणवंती कांबळे यांचे सह माजी विद्यार्थी संजय घागरे, स्वप्निल पिंगुळकर, नीता लोके, ओमकार कोळेकर हे उपस्थित होते. NCC डे च्या विशेष कार्यक्रमास शाळेचे माजी विद्यार्थी वायुसेना विंग कमांडर 
हर्षद गाभारे, तारक मेहता का उल्टा चष्मा या टीव्ही मालिकेतील  कलाकार मंदार चांदवडकर ( NCC राष्ट्रिय छात्र सेना चे राजदूत), राष्ट्रिय कबड्डीपटु गौरी वाडेकर, चित्रपट अभिनेते अंकुश चौधरी हे माजी विद्यार्थी "गुरुदक्षिणा" चे सदस्य आहेत. त्यांचीही उपस्थिती आवर्जून असणार आहे. या होणाऱ्या छात्र सेना दिवस कार्यक्रमात केडेटस ने बनविलेले भारतीय संरक्षण संदर्भातील विविध विषयां संदर्भातील प्रश्न मंजूषा,संचलन स्पर्धा, ज्वेल ऑफ़ एनसीसी हा सन्मान सोहळा, सैन्य दलआयुध प्रदर्शन आदी प्रदर्शनात नागरिकांना पाहता येणार आहेत. श्रीमती कमला मेहता ब्लांइड स्कूल च्या विद्यार्थीनी यांचा ही प्रदर्शनात मोलाचा सहभाग असणार आहे.

26 नोव्हेंबर रोजी आपल्या मुंबईवर अतिरेकी हल्ला झाला होता त्याच दिवसाचे स्मरण करीत हल्ल्यात शहीद झालेल्या शुरवीर NSG कमांडो,मुंबई पोलिस दलातील अधिकारी यांनी गाजविलेल्या शौर्याला एक प्रकारे सैल्युट असणार असून आम्ही त्यांच्या प्रति आपले श्रद्धा सुमन अर्पण करणार आहोत.

26 नोव्हेंबर 17 रोजी सकाळी 10 वाजता NCC चे आजी माजी छात्र सैनिक ,शालेय विद्यार्थी आणि भारतीय नागरिक एक ताला सुरात NCC गीत गाणार आहेत.जवळपास दहा हजार लोक गीत गात आहेत असे थेट चित्रीकरण प्रक्षेपण करण्यात येणार आहे.एकाच वेळी दहा हजार लोक "हम सब भारतीय है" हे गीत गातील हा अद्वितीय,अद्भुत रोमांचकारी अनुभव साऱ्या देशाला "गुरु दक्षिणा" स्वरुपात देण्याचा आमचा मानस असल्याचे मुख्याध्यापिका गुणवंती कांबळे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS Live Score: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT