मुंबई

सभागृहात मराठी शब्द का नाही उच्चारत? दिवाकर रावतेंचा शिवसेनेला घरचा आहेर

दीनानाथ परब

मुंबई : मराठी भाषेच्या मुद्यावरुन शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि आमदार दिवाकर रावते यांनी ठाकरे सरकारला घरचा आहेर दिला आहे. सभागृहाच्या कामकाजात इंग्रजी शब्दांच्या वापरावर त्यांनी जोरदार आक्षेप घेतला. "स्पेसिफिक, पॉझिटिव्ह, डिमांड, पेन्शन आणि स्कोप हे शब्द कशासाठी वापरता? पॉझिटिव्ह ऐवजी सकारात्मक बोला, डिमांडऐवजी मागणी बोलू शकता. सभागृहात इंग्रजीऐवजी मराठी शब्दांचा वापर करा. मराठीला ऐवढे का घसरवता ?" असा सवालही त्यांनी उपस्थित केला. 

दिवाकर रावते यांची मराठीच्या मुद्यावर नेहमीच आग्रही भूमिका राहिली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात मंत्रिपद भूषवलेल्या दिवाकर रावते यांनी मराठी भाषेच्या मुद्यावरुन ठाकरे सरकारला टोले लगावले. “सभागृहाच्या कामकाजात इंग्रजी शब्दांचा वापर करणं चुकीचं आहे. मराठी शब्द संग्रह असताना इंग्रजीचा वापर करणं म्हणजे हास्यास्पद प्रकार आहे" असे दिवाकर रावते म्हणाले. 

"५४ वर्षांपूर्वी मराठी भाषेसाठी शिवसेनेची निर्मिती झाली. मराठी माणसासाठी, मराठी माणसावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी शिवसेनेची निर्मिती झाली. आजही मराठी माणसाची माया शिवसेनेवर आहे. याच शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना देखील अर्थसंकल्पात मराठी भाषेच्या संवर्धनाबद्दल एक शब्दही नमूद करण्यात आलेला नाही" याबद्दल दिवाकर रावते यांनी खंत व्यक्त केली.

mumbai news shivsena leader diwakar raote slams shivsena over use of marathi in assembly house

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: संतापजनक! शाळेच्या टॉयलेटमध्ये रक्त दिसलं, मासिक पाळीच्या संशयातून मुलींना विवस्त्र केलं अन्...; ठाण्यातील प्रकारानं खळबळ

Video Viral: शुभमन गिलला समोरून जाताना पाहून काय होती सारा तेंडुलकरची रिऍक्शन? पाहा

Viral Video: धक्कादायक! लिफ्टमध्ये लहान मुलाला जबर मारहाण; ठाण्यातील संतापजनक घटना, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

मराठी चित्रपटसृष्टीच्या मागण्यांबाबत राष्ट्रवादी सांस्कृतिक चित्रपट विभागाने घेतली सांस्कृतिक मंत्र्यांची भेट

धक्कादायक! एकाच कुटुंबातील चौघांचा जीव देण्याचा प्रयत्न, तिघांचा मृत्यू; घटनेमागचं कारण काय?

SCROLL FOR NEXT