Toll-naka
Toll-naka 
मुंबई

टोलवसुलीची भूमिका तीन आठवड्यांत स्पष्ट करा

सकाळवृत्तसेवा
मुंबई - मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील टोल नाक्‍यांवर मोटारचालकांकडून टोलवसुली करू नये, अशी मागणी करणाऱ्या जनहित याचिकेवर तीन आठवड्यांत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी राज्य सरकारला दिले. "माहिती अधिकार' कार्यकर्ते प्रवीण वाटेगावकर यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर न्या. अभय ओक आणि न्या. रियाझ छागला यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. राज्य सरकारकडून नियमबाह्य पद्धतीने टोलवसुली केली जात आहे, असा आरोप याचिकादाराने केला आहे. राज्य सरकारच्या तीन वर्षांपूर्वीच्या निर्णयानुसार राज्यभरातील 12 टोल नाके बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता; तसेच काही टोल नाक्‍यांमधून मोटारचालकांना आणि एसटी बसचालकांना टोलमुक्ती देण्याचाही निर्णय जाहीर केला होता; मात्र अद्याप या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही, असा दावा याचिकादाराच्या वतीने करण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Pawar: रोहित पवारांनी शेअर केलेल्या 'त्या' व्हिडिओनंतर PDCC बँकेच्या मॅनेजरसह बँकेवर गुन्हा दाखल

Bidkin Crime News : धक्कादायक! भीशीचे व व्याजाचे पैसे न दिल्याने महिलेसह पाच मुलांचे अपहरण

Yuzvendra Chahal: ऋषभ पंतची विकेट चहलसाठी ठरली ऐतिहासिक! T20 मध्ये कोणत्याच भारतीयाला न जमलेला केला पराक्रम

Lok Sabha Election 2024: देशभरात तिसऱ्या टप्प्यात 61 टक्के, महाराष्ट्रात 54.09 टक्के मतदान

IPL 2024 DC vs RR Live Score: दुसऱ्याच चेंडूवर राजस्थानला मोठा धक्का! जैस्वालला ४ धावांवरच झाला आऊट

SCROLL FOR NEXT