Bombay high court sakal
मुंबई

Mumbai News: कोरोना काळात काम करणाऱ्या पालिका अभियंत्यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा कशासाठी?

सरकारला माहिती देण्यासाठी चार आठवड्याचा अवधी

सकाळ वृत्तसेवा

Mumbai News: कोरोनाच्या संकट काळात रेमडेसिविर इंजेक्शन आणि बाॅडी बॅगची चढ्या दराने खरेदी केल्याचे आरोपावरून पालिका अभियंत्यांची ईडी व ईओडब्ल्यूकडून चौकशी केली जात आहे.

याप्रकरणी अभियंत्यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. न्यायालयाने याचिकेची दखल घेत सरकारला याप्रकरणी सविस्तर माहिती देण्यासाठी चार आठवड्यांचा अवधी दिला आहे.

कोरोना काळात जिवाची पर्वा न करता महामारीशी लढलेल्या पालिका अभियंत्यांच्या मागे आर्थिक गुन्हे शाखा (ईओडब्ल्यू) आणि ईडी चौकशीचा ससेमिरा लावला असून अभियंत्यांच्या म्युनिसिपल इंजिनिअर्स असोसिएशन आणि म्युनिसिपल मजदूर युनियनने ऍड. हर्षवर्धन सुर्यवंशी यांच्यामार्फत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

१८५७ च्या महामारी कायद्याचे कलम ४ तसेच २००५ च्या आपत्कालीन व्यवस्थापन कायद्यातील तरतुदींकडे आर्थिक गुन्हे शाखा आणि ईडीने दुर्लक्ष केले आहे. त्या तरतुदी विचारात घेतल्यास आम्ही कोरोना काळात पालिका आयुक्तांच्या आदेशानुसार जे काम केले, त्यासाठी कुठलीही चौकशी वा कुठल्याही प्रकारचे ऑडीट लागू होत नाही, असा दावा पालिका अभियंत्यांनी याचिकेत केला आहे.

आज(ता.४) न्या. रेवती मोहिते-डेरे आणि न्या. मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी घेण्यात आली.

त्यावेळी सरकारतर्फे ऍड. प्राजक्ता शिंदे यांनी भूमिका स्पष्ट करण्यासाठी खंडपीठाकडे वेळ मागितला. सरकारच्या या वेळकाढू भूमिकेवर याचिकाकर्त्या अभियंत्यांतर्फे ऍड. सुर्यवंशी यांनी आक्षेप घेत ही मुभा देऊ नये अशी मागणी केली. त्यानंतर न्यायालयाने सरकारला आणखी वेळ देत सुनावणी चार आठवड्यांसाठी तहकूब केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विजयला रोखण्यासाठी स्टालिन यांचा होता 'भाजप'वाला प्लॅन, 'शत्रू'सोबत हातमिळवणीची दिलेली ऑफर; मोठ्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ

Europe Heatwave: युरोपमध्ये उष्णतेचा कहर! रस्ते वितळले, लोखंडी ट्रॅक वाकले, हजारो नागरिक रुग्णालयात...भयानक व्हिडिओ व्हायरल

Shaktipeeth Highway : शक्तिपीठ महामार्गावरून विधानसभेत खडाजंगी! विरोध झुगारून सरकार प्रकल्प पुढे रेटणार? MSRDC च्या हालचालींना वेग, काय म्हणाले मंत्री शिवेंद्रराजे?

Mumbai Local: 'चार मर्डर केलेत, आता तुझा नंबर', लोकलमध्ये मद्यधुंद व्यक्तीचा धिंगाणा, जीवे मारण्याची धमकी; VIDEO VIRAL

Ayodhya Ram Mandir Theft : राम मंदिरातील योग केंद्रात काळाबाजार? रहस्यमय पेटीवर QR कोड; अयोध्या राम मंदिर चोरी प्रकरणात धक्कादायक खुलासे

SCROLL FOR NEXT