mp Shrikant Shinde esakal
मुंबई

Mumbai News : जुन्या इमारतीसाठी सर्व प्राधिकरणांना एकत्रित आणून धोरण तयार करणार - खासदार श्रीकांत शिंदे

मुंबईतील जुन्या इमारतींचा पुनर्विकास गेल्या अनेक वर्ष रखडला आहे. वसाहतींची साफ सफाई, पाणी समस्या, परिसर विकास आदी समस्या सोडवायला हव्यात.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - मुंबईतील जुन्या इमारतींचा पुनर्विकास गेल्या अनेक वर्ष रखडला आहे. वसाहतींची साफ सफाई, पाणी समस्या, परिसर विकास आदी समस्या सोडवायला हव्यात. जुन्या इमारतींचा पुनर्विकास रखडला आहे, ट्रान्झिस्ट कॅम्पमध्ये अनेकवर्षापासून रहिवाशी राहत असून ते अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते आहे. यासाठी म्हाडा, एसआरए, पालिका आदी प्राधिकरणांना एकत्र आणून नवे धोरण तयार तयार करून निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली.

ट्रान्झिस्ट कॅम्पमध्ये राहणारे रहिवाशी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते आहे. धोरण नसल्याने या ट्रान्झिस्ट कॅम्पच्या समस्या सुटू शकलेल्या नाहीत. त्यामुळे अनेक वर्षापासून येथील रहिवाशी पुनर्विकासाच्या प्रतिक्षेत आहेत. त्यांच्या वसाहतींची स्वच्छता, पाणी, आरोग्याची समस्य़ा तसेच तेथील एकूणच परिसराचा विकास हाती घेणे आवश्यक आहे.

या इमारती विविध प्राधिकरणाच्या अखत्यारित असल्याने सर्व प्राधिकरणाने एकत्रित आणून धोरण तयार करून रहिवाशांचे प्रश्न सोडवले जाणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले. याबाबत पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्याशी त्यांनी चर्चा केली आयुक्त सकारात्मक असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

समूह विकास

ठाण्यातील इमारतींचा रखडलेला पुनर्विकास समूह विकास (क्लस्टर डेव्हलपमेंट) च्या माध्यमातून केला जाणार आहे. यावर मुख्यमंत्रीही सकारात्मक आहेत. सिडकोच्या अखत्यारित घरे बांधली जाणार आहे. ठाण्याच्या धर्तीवर मुंबईतील इमारतींचाही पुनर्विकास करण्याचा विचार केला जाईल. त्यासाठी सर्व प्राधिकरणांना एकत्र आणून निर्णय घेतला जाईल असे खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Palkhi Route Development : संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील कामाला गती

Pune Traffic: वडगाव घेनंद घाटात अवजड वाहन बंद; भर पावसात पोलिसांनी वाहतूक कोंडी सोडवली.

Tomato Rate : नारायणगावात टोमॅटोच्या भावात घसरण; उपबाजारात हंगामातील उच्चांकी ६० हजार टोमॅटो क्रेटची आवक

CET Exam Result : सीईटी परीक्षेत बारामतीचा डंका, दोन विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाइल

Uddhav Thackeray: ''मी सतत लोकांना भेटलो तर माझी किंमत उरणार नाही'', उद्धव ठाकरे 'त्या' मुलाखतीत काय म्हणाले होते?

SCROLL FOR NEXT