Man ki Baat sakal
मुंबई

Mumbai : मुंबईत आज ५ हजार ठिकाणी 'मन की बात' चे आयोजन

कार्यक्रमाचे प्रसारण सकाळी ११ वाजता होणार आहे. मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी ही माहिती दिली आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ' मन की बात' कार्यक्रमाच्या १०० व्या पर्वासाठी मुंबई भाजपाच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे. मुंबईसह उपनगरातील ३६ विधानसभेतील ५ हजाराहून अधिक ठिकाणी 'मन की बात' कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण ऐकण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे,

कार्यक्रमाचे प्रसारण सकाळी ११ वाजता होणार आहे. मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी ही माहिती दिली आहे.

नरेंद्र मोदी हे पंतप्रधान पदी विराजमान झाल्यापासून त्यांनी ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून सामान्य नागरिकांशी संवाद साधण्यास सुरूवात केली. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अहवालानुसार 'मन की बात ' १०० कोटी श्रोत्यांपर्यंत पोहोचली आहे. 'मन की बात'चे २३ कोटी नियमित श्रोते आहेत. ९६ टक्के लोकांना या कार्यक्रमाबाबत माहिती आहे. देशभरातील वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांच्या कार्याचा सन्मान देखील या माध्यमातून करण्यात आला आहे.

उद्या प्रसारित होणाऱ्या शंभराव्या भागानिमीत्ताने मुंबईत भाजप खासदार, आमदार आणि पदाधिकारी मुंबईत ठिकठिकाणी आपापल्या विभागातील कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील सर्व ३६ विधानसभेत प्रत्येकी १०० कार्यक्रम निश्चित करण्यात आले आहेत.

तर पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई महिला कारागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. घरकाम करणाऱ्या महिला, महिला बचत गट तसेच गृहउद्योगातील महिला, सफाई कामगार, अंगणवाडी सेविका, मुस्लिम महिला, रिक्षाचालकांना कार्यक्रमासाठी खास आमंत्रित करण्यात आले आहे.

ओबीसी मोर्चाच्यावतीने ५० चहाच्या स्टॉलवर मोफत चहा वितरण करण्यात येणार आहे. अल्पसंख्याक आघाडीच्यावतीने शीर खुर्मा बेत करत प्रमुख दर्गा, मदरसा आणि उर्दू शाळांमध्ये कार्यक्रम होईल.मुंबईतील डबेवाल्यांसाठी कार्यक्रम घेण्यात येणार आहे. संयुक्त महाराष्ट्र दालनात कामगार आघाडीचा विशेष कार्यक्रम होईल अशी माहिती शेलार यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navi Mumbai: नवी मुंबईत धक्कादायक घटना; विजेचा शॉक लागून दोन कॉलेज विद्यार्थिनी पाण्यात पडल्या; घटनेनं खळबळ

श्रीसंतला मोठा दिसाला! KCA ने घातलेली तीन वर्षांची बंदी उठवली, नेमका काय होता आरोप?

दारुबंदीसाठी महिलांचे आंदोलन सुरु असताना पती नशेत पोहोचला, पत्नीने शिकवला कायमचा धडा

गिरगावच्या हाय-प्रोफाईलचं धक्कादायक वास्तव समोर, फक्त मराठी अभिनेत्री नाहीतर बॉलिवूड अभिनेत्रीचा झालेला सौदा

Latest Marathi News Live Update : पुण्यात रिमझिम पावसानेच झाड कोसळलं

SCROLL FOR NEXT