Kaali Peeli Esakal
मुंबई

Kaali Peeli: मुंबईच्या रस्त्यांवरुन प्रसिद्ध 'काली-पीली' होणार गायब; सोमवारपासून पद्मिनी टॅक्सीला कायमचा ब्रेक

मुंबईच्या रस्त्यावरुन सोमवारपासून पद्मिनी टॅक्सीला कायमचा ब्रेक

अंकिता खाणे (Ankita Khane)

मुंबईतील जुनी डबल डेकर बस सेवेतून निवृत्त झाल्यानंतर आता काळी पिवळी 'पद्मिनी टॅक्सी'सुद्धा मुंबईच्या रस्त्यावरुन गायब होणार आहे. उद्यापासून (सोमवार) काळी पिवळी पद्मिनी टॅक्सी मुंबईच्या रस्त्यांवर दिसणार नाही. पाच दहशकांहून अधिक काळ ही टॅक्सी मुंबईच्या रस्त्यावर धावत आहे.

परिवहन विभागाच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, शेवटची 'प्रीमियर पद्मिनी' 29 ऑक्टोबर 2003 रोजी ताडदेव आरटीओ येथे काळी-पिवळी टॅक्सी म्हणून नोंद झाली होती.

ज्यांनी शेवटची पद्मिनी टॅक्सी खरेदी केली त्या टॅक्सीचे मालक अब्दुल करीब कारसेकर म्हणाले, ही टॅक्सी मुंबईची शान आहे. तर पद्मिनी टॅक्सीची सुरूवात 1964 साली झाली होती. या टॅक्सीचे उत्पादन 2001 साली बंद करण्यात आले आहे.

नवे मॉडेल्स आणि अॅपमुळे ही काळी-पिवळी टॅक्सी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र नव्या मॉडेलच्या काळ्या पिवळ्या टॅक्सी मुंबईच्या रस्त्यांवरुन धावताना दिसणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT