मुंबई

मुंबईत इंधनाचे दर शंभरीच्या मार्गावर; पेट्रोल, डिझेल पुन्हा महागले

प्रशांत कांबळे

मुंबई: नवीन वर्षात नागरिकांना कोरोनाच्या महामारीसह इंधन दरवाढीचा भडका सुद्धा सहन करावा लागतो आहे. जागतिक पातळीवर इंधनाचे दर कमी असले तरी, मुंबईसह राज्यात पेट्रोल, डिझेलच्या दराने उच्चांक गाठला आहे. आठवड्याच्या फरकाने 34 ते 80 पैशांपर्यंत दर वाढतच असून, गेल्या 10 दर स्थिर असताना मंगळवारी पुन्हा दरवाढ झाल्याने सर्वसामान्य वाहतुकदारांचे कंबरडे मोडले आहे.

मंगळवारी मुंबईत पेट्रोल 34 पैसे तर डिझेल 37 पैशाने वाढले असून, या दरवाढीचा राज्यभरात राजकीय पक्ष आणि नागरिकांकडून निषेध केला जात आहे. त्यानंतरही अद्याप ही दरवाढ सुरूच आहे. पेट्रोल दरवाढीमुळे खासगी वाहतुकदारांवर परिणाम झाला. डिझेल दरवाढीमुळे मालवाहतुकदारांवर परिणाम झाला आहे. कोरोनाच्या लॉकडाऊनकाळात मालवाहतुकदारांचा व्यवसाय बंद होता. मात्र, अनलॉकनंतर व्यवसायात तेजी येईल अशी अपेक्षा असताना, सातत्याने होत असलेल्या दरवाढीमुळे वाहतूकदार पुन्हा अडचणीत सापडले असल्याचे राज्य वाहन मालक चालक आणि प्रतिनिधी महासंघाचे अध्यक्ष बाबा शिंदे यांनी सांगितले आहे.

यापूर्वी जानेवारी महिन्यात इंधनाच्या दरात सातत्याने वाढ होती. दरम्यान काही दिवस दर स्थिर राहिल्यानंतर पुन्हा 26 जानेवारी पासून दरांमध्ये वाढ पाहायला मिळाली. त्यानंतर, आता पुन्हा इंधनाच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिक आर्थिक अडचणीत सापडले आहे. शिवाय कोरोनाच्या लॉकडाऊन काळात सार्वजनिक प्रवासी सेवा बंद असल्याने, गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत गेल्यावर्षी कोरोनाच्या काळात सर्वाधिक वाहनांची विक्रीची नोंद झाली आहे. मात्र, आता इंधन दरवाढीमुळे या वाहनांच्या इंधनाच्या मेंटनन्स बिघडल्याचे दिसते आहे.

महानगरांच्या तुलनेत मुंबई सर्वाधिक महागडी

मुंबईतील पेट्रोलचा दर 93.83 रूपये आहे. तर चेन्नई 89.70, दिल्ली 87.30, कोलकाता 88.63 रुपये आणि मुंबईत डिझेल 84.36 रुपये त्याचप्रमाणे चेन्नई 82.66, दिल्ली 77.48, कोलकाता 81.6 रुपये दर असून, या चार महानगराच्या पेट्रोल, डिझेल च्या दरांची तुलना केल्यास, सर्वाधिक महाग मुंबईत इंधनाचा भडका झाल्याचे दिसून येते.

-----------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Mumbai Petrol and diesel prices today inched higher Tuesday February 9 2021

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Radhika Kheda: "मला मद्य पिण्याची ऑफर दिली अन् कार्यकर्ते..."; राधिका खेरांचा काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर गंभीर आरोप

Artificial Intelligence in Business: चक्क ९४ टक्के भारतीय प्रोफेशनल्स करतात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, काय आहे कारण ?

The Family Man 3: प्रेक्षकांसाठी खुशखबर! 'द फॅमिली मॅन 3'बद्दल मनोज बाजपेयींनी दिली मोठी अपडेट

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

Latest Marathi News Update: निवडणूक आयोगाची मोठी कारवाई! रत्नागिरीत तीन कोटींची रोकड पकडली

SCROLL FOR NEXT