Mumbai University
Mumbai University  Sakal
मुंबई

Mumbai: मुंबई विद्यापीठात फुले- आंबेडकर जयंतीसप्ताह निमित्त परिसंवाद

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - महात्मा जोतीराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती सप्ताहाच्या निमित्ताने मुंबई विद्यापीठात विशेष परिसंवाद आणि चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे ते १४ एप्रिलपर्यंत चालणार असून यात अनेक तज्ज्ञ आणि मान्यवर विविध विषयांवर आपले विचार मांडणार असल्याची माहिती या जयंती सप्ताहाच्या समन्वयक डॉ. मनिषा करणे यांनी दिली.

जयंती सप्ताहाच्या निमित्ताने शनिवारी महात्मा जोतीराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची दुर्मिळ पुस्तके आणि छायाचित्रांच्या प्रदर्शनाला सुरूवात झाली आहे. हे प्रदर्शन जवाहरलाल नेहरु ग्रंथालयात भरविण्यात आले आहे.

सोमवारी १० एप्रिल रोजी फुले शाहू आंबेडकर विचारमंथन या विषयावर ज्येष्ठ साहित्यिक ज. वि. पवार यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद होत असून त्यात वक्ते म्हणून डॉ. धम्मसंगिनी गोरख, प्रा. कांचना महादेवन डॉ. श्रीरंजन आवटे, डॉ. अनिल सकपाळ आदी सहभागी होतील. हा परिसंवाद कवीवर्य कुसुमाग्रज मराठी भाषा भवन येथे होणार आहे.

दुसऱ्या एका सत्रात आधुनिक भारताच्या निर्मितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे बहुआयामी योगदान या विषयावर डॉ. सुनीता मगरे, डॉ. अरुण वाघेला, डॉ. सुरेश मैंद, डॉ. सुनील अवचार आदी विचार मांडतील.

मंगळवारी, ११ रोजी सकाळच्या सत्रात कवीसंमेलनाचे आयोजन करण्यात आले असून त्यात अविनाश गायकवाड, छाया खोब्रागडे, राकेश शिर्के, कविता मोरवणकर, सुदाम राठोड, आदींचा सहभाग असेल.

बुधवारी १२ एप्रिल रोजी सकाळच्या सत्रात महात्मा जोतीराव फुले आणि सत्यशोधक समाज: समकालीन संदर्भ या विषयावर डॉ. सुरेंद्र जोंधळे, डॉ.आशालता कांबळे, सतीश पावडे, डॉ. देवकुमार अहिरे आणि डॉ. वंदना महाजन आपले विचार मांडतील हा परिसंवाद आयसीएसएसआर हॉल, जे. पी. नाईक भवन येथे होणार आहे.

गुरुवारी १३ एप्रिल रोजी टेक्सास विद्यापीठाचे प्रा. स्कॉट स्ट्राऊड यांचे विशेष व्याख्यान सकाळच्या सत्रात होईल, तर दुपारच्या सत्रात फुले, शाहू, आंबेडकर: स्त्रीवाद या विषयावर डॉ. वंदना महाजन, डॉ. लता प्रतिभा मधुकर, सुरेखा पैठणे आदी आपले विचार मांडतील.

जयंती सप्ताहाच्या अखेरच्या दिवशी शुक्रवारी, १४ एप्रिल रोजी विद्यापीठाच्या कलिना संकुल परिसरात संविधान रॅली काढली जाणार असून त्यात शारीरिक शिक्षण विभागाचे लेझीम पथक सहभागी होणार असल्याची माहिती जयंती उत्सवाच्या समन्वयक डॉ. मनिषा करणे यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Modi Rally: "मोदीजी आता कांद्यावर बोला" मोदींनी भाषण मध्येच थांबवलं! पिंपळगाव बसवंतच्या सभेत काय घडलं?

PM Modi Nashik: नाशिकमध्ये पंतप्रधान अखेर कांद्यावर बोललेच; ऑपेरेशन ग्रीन, निर्यात बंदी आणि बफर स्टॉकबाबत म्हणाले...

Chandu Champion : 'चॅम्पियन आ रहा है'...कार्तिकच्या आगामी सिनेमाचं पोस्टर रिलीज; लूकची होतेय चर्चा

Mumbai Metro: पंतप्रधान मोदींच्या रोड शोसाठी मुंबईत मेट्रो बंद; सुरक्षेचे कारण देत घेतला निर्णय

Latest Marathi News Live Update: 14 लोकांना CAA अंतर्गत भारतीय नागरिकत्व मिळाले

SCROLL FOR NEXT