knife-killing sakal media
मुंबई

Mumbai : गोरेगाव भागात चाकूने भोसकून एकाची हत्या; मारेकरी अटकेत

त्यातून शनिवारी वाद सुरू असताना आरोपी आदित्य नलावडे याने चाकूने राजूच्या गळ्यावर, छातीवर व पोटात वार केले.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - गोरेगाव पूर्व येथे 27 वर्षीय तरूणाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आल्याचा प्रकार शनिवारी रात्री घडला आहे. याप्रकरणी वनराई पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी 21 वर्षीय तरूणाला रविवारी अटक केली.

आदित्य नलावडे असे अटक आरोपीचे नाव आहे. हत्येत वापरण्यात आलेल्या चाकू अद्याप पोलिसांच्या हाती लागला नसून त्याचा शोध सुरू असल्याच पोलिसांनी सांगितले.राजू साहेबु सुरंजे असे मृत व्यक्तीचे नाव असून त्याच्या छातीत, गळ्यात व पोटात चाकूने वार करण्यात आले आहे. त्याला जखमी अवस्थेत शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

याप्रकरणी सुरूवातीला वनराई पोलिसांकडून हत्येचा प्रयत्न कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. राजू याच्या मृत्यूनंतर पोलिसांनी याप्रकरणी हत्येचे कलम वाढवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. मृत राजू हा गोरेगाव पूर्व येथील कामा इस्टेट परिसरातील रहिवासी आहे. राजूचा त्याच परिसरात राहणाऱ्या निवासी राणी मिश्रा व तिची आई यांच्यासोबत वाद झाला होता.

त्यातून शनिवारी वाद सुरू असताना आरोपी आदित्य नलावडे याने चाकूने राजूच्या गळ्यावर, छातीवर व पोटात वार केले. त्यात राजू गंभीर जखमी झाला होता.पुढे उपचारादरम्यान राजूचा मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी आदित्यला याप्रकरणी अटक केली. आदित्य कामा इस्टेट परिसरातील रहिवासी आहे. तो गॅरेजमध्ये काम करतो, अशी माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी वनराई पोलीस अधिक तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs DC मॅचमध्ये राडा! मैदानात खेळाडूंमध्ये बाचाबाची अन् स्टँड्समध्ये चाहत्यांची तुफान हाणामारी; Video Viral

Unseasonal Rain : उरुळी कांचनसह परिसराला गारांसह अवकाळी पावसाने झोडपले; विद्युत खांब, झाडांची पडझड, गहू व कांदा पिकाचे मोठे नुकसान

Latest Marathi News Live Update : पुणे शहरातील अनेक प्रमुख रस्ते पाण्याखाली

सगळे दिसले पण हनुमान कुठेय? 'रामायण' टीझरमध्ये हनुमान न दिसल्याने प्रेक्षक चकीत; हे आहे कारण

Crime: भावजयचे दिरासोबत अनैतिक संबंध, जाऊबाई संतापली, भर पंचायतीत ॲसिडची बाटली आणली अन्...; धक्कादायक कृत्य

SCROLL FOR NEXT