crime  sakal
मुंबई

Mumbai police Crime : मुंबई पोलिसांच्या पथकावर संभाजी नगरमध्ये हल्ला, पोलिसांकडून चौघांना अटक

पोलिसांवर हल्ला आणि खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली

सकाळ वृत्तसेवा

Mumbai police Crime - दहिसर पोलिसांच्या पथकावर एका प्रकरणाच्या तपासासाठी संभाजी नगरला गेले असता तेथे पोलिसांववर हल्ला झाला. स्थानिक गावकऱ्यांनी पोलीस पथकावर हल्ला करून दोन संशयित आरोपीना पळून जाण्यास मदत केली. या घटनेत एक पोलिस हवालदार विनोद चितळकर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

पोलिसांवर हल्ला आणि खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे.अर्जुन ब्राह्मणवत, विठ्ठल ब्राह्मणवत, पवन ब्राह्मणवत आणि प्रताप बिघोत अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.या आरोपींच्या चौकशीत या हल्ल्यामागे नेमके कोण आहे याचा शोध पोलीस घेत आहेत.

मुंबईमध्ये झालेल्या पोलीस भरती परीक्षेदरम्यान काही उमेदवाराविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक अधिकारी आणि चार हवालदारांचा समावेश असलेले पोलीस पथक संभाजी नगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात गेले होते.

दहिसर पोलिसांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने या प्रकरणातील दोन संशयित आरोपींना अटक केली. शुक्रवारी पहाटे 2 ते 3 वाजताच्या दरम्यान दहिसर पोलिसांच्या पथकावर 30 गावकऱ्यांनी हल्ला केला.या हल्ल्यात दहिसर पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल विनोद चितळकर जखमी झाले आहेत.

गावकऱ्यांनी दोन्ही संशयितांची सुटका करून पळ काढला. त्यानंतर चितळकर यांना डॉक्टरांकडे नेण्यात आले आणि 10 जणांविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला, त्यापैकी चार जणांना अटक करण्यात आली आहे. दहिसर पोलिसांचे पथक अद्याप संभाजी नगरमध्ये आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officer Scam Arrested : निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी १६९ कोटींचा घोटाळा केल्याचे समजलं; आयएएस अधिकाऱ्याला CBI कडून अटक; ८ विभागात ५०४ कोटी लाटले?

Latest Marathi News Live Update : नेरूळमध्ये पावसात शॉर्टसर्किटचा धक्का; करंट लागून दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनी जखमी

Luxury Bus Bike Accident : लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुण ठार, बसचालक फरारी, पोलिसांकडून शोध सुरू

लेकाचा मृतदेह आला पण फुफ्फुस, हृदयासह अवयव गायब; फक्त डोकं आणि असंख्य टाक्यांनी शिवलेलं धड

शी... हे काय वागणं! ५२ वर्षांच्या राम कपूरने २५ वर्षीय मुलाला जबरदस्ती केलं किस; 'लॉकअप' २ चा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT