मुंबई

मराठा आरक्षणावरून सरकार आणि प्रशासनात जुंपली ! अशोक चव्हाण यांची आक्रमक भूमिका

संजय मिस्कीन

मुंबई :  एसईबीसी प्रवर्गातील उमेदवारांना ईडब्ल्यूएसचे लाभ देण्याबाबत प्रशासनाकडून दिरंगाई होत असल्याबद्दल मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी  तीव्र नाराजी व्यक्त केल्यानंतर मुख्य सचिवांनी सर्व विभागांना खरमरीत पत्र पाठवून याबाबतचा अनुपालन अहवाल मागवला आहे.

विविध विभागातील भरती प्रक्रिया व शैक्षणिक प्रवेशाबाबत मराठा समाजातील अनेक उमेदवारांनी याबाबत चव्हाण यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. मंगळवार ( ता. 23 ) ला झालेल्या उपसमितीच्या बैठकीत चव्हाण यांनी या प्रकाराबद्दल तीव्र असंतोष व्यक्त केला. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत भूमिका निश्चित झाल्यानंतर आणि सामान्य प्रशासन विभागाने शासन निर्णय जारी केल्यानंतरही एसईबीसी प्रवर्गातील नोकर भरतीचे उमेदवार व शैक्षणिक अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रियेतील विद्यार्थ्यांना ईडब्ल्यूएसचे लाभ देण्याबाबत दिरंगाई का? असा संतप्त सवाल त्यांनी केला.

मंगळवारी रात्री त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन हा संपूर्ण प्रकार त्यांच्याही निदर्शनास आणून दिला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी देखील याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार मुख्य सचिव संजय कुमार यांनी बुधवार ( ता. 24 ) ला  राज्य शासनाच्या अखत्यारीतील सर्व विभागाच्या सचिवांना पत्र पाठवून शासनाच्या सदरहू निर्णयाच्या अंमलबजावणीबाबत दर सोमवारी सकाळी 11 वाजेपर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मराठा आरक्षण विषयक  मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांना अहवाल पाठवण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. 

राज्य मंत्रीमंडळाने निर्णय घेतल्यानंतरही मंत्रालयातील विविध विभाग स्वतंत्रपणे परिपत्रक काढत असल्याने अशोक चव्हाण यांनी संताप व्यक्त केला होता. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनाही व्यक्तिगत भेटून चव्हाण यांनी मंत्रालयातील प्रशासनाच्या बाबतीत नाराजी व्यक्त केली होती. यावर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी गंभीर दखल घेत मुख्य सचिवांना धारेवर धरल्याचे समजते.

mumbai political news maratha reservation quarrels between government and administration

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EPFO Interest Update : होळीला कोट्यवधी भारतीयांना मिळणार खुशखबर ! PF वर मिळणार तब्बल 'इतके' व्याज, CBT बैठकीत मोठा निर्णय ?

Mumbai News: महिलांच्या हातामध्ये आता ‘पॅनिक बटण’, यात्री अ‍ॅपमध्ये ‘एसओएस’ फीचर; वापर कसा करायचा?

T20 WC, IND vs WI : जसप्रीत बुमराहने ३ चेंडूंत फिरवलेली मॅच, पण वेस्ट इंडिजच्या फलंदाजांची खणखणीत फटकेबाजी; भारतासमोर तगडे लक्ष्य

8th Central Pay Commission : आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट ! महागाईच्या पार्श्वभूमीवर ५०% DA मर्जर होणार ?

T20 WC, IND vs WI : शिमरोन हेटमायरच्या विकेटवरून 'राडा'! विडींजच्या खेळाडूंची तीव्र नाराजी, वातावरण तापले; जसप्रीतने दिले २ धक्के

SCROLL FOR NEXT