Toll Sakal
मुंबई

पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावर तात्पुरती टोल माफी

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर दुरूस्तीचे काम चालू असल्यामुळे टोल न आकारण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तात्पुरती टोल माफी मिळणार आहे. तसेच द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. अशी माहिती ABP माझा या वृत्तवाहिनीने दिली आहे.

(Toll Free For Today Mumbai Pune Express Way)

मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर सध्या दुरूस्तीचे काम सुरू आहे. ओव्हरहेड गॅन्ट्रीच्या कामामुळे या महामार्गावर सध्या मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली आहे. त्याचबरोबर गणेशोत्सव आणि सुट्ट्यामुळे पर्यटकांची आणि गणेशभक्तांची महामार्गावर गर्दी झाली आहे. ही गर्दी टाळण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी तात्पुरती टोलमाफी केली होती. त्यानंतर ही टोल आकारणी सुरळीतपणे चालू आहे. त्याचबरोबर गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या भक्तांसाठी टोल माफीची घोषणा काल मुख्यमंत्र्यांनी केली होती. त्यानुसार ज्या वाहनांकडे गणेशोत्सवासाठी पास किंवा स्टिकर्स आहेत त्या वाहनांना टोल माफ करण्यात येत आहे.

दरम्यान, आज सकाळी लोणावळा येथील अमृतांजन पूलाजवळ अपघात घडला होता. त्यामुळे दीड ते दोन किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्याचबरोबर महामार्गाच्या दुरूस्तीच्या कामामुळे काल दोन तासासाठी महामार्गावर ब्लॉक देण्यात आला होता. त्यानंतर आज वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महामार्गावर अर्ध्या तासासाठी टोलमाफी देण्यात आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गोव्याचे मंत्री रवी नाईक यांचं हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन, दोनवेळा भूषवलेलं मुख्यमंत्रीपद

Raju Shetti: शेतकऱ्यांना यंदा उच्चांकी दर मिळवून देणार: राजू शेट्टी; स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ऊस दर निर्णायक बैठक, ऊसतोडीची गडबड करू नये

IPS अधिकाऱ्यावर अंत्यसंस्कार होण्याआधी त्यांच्यावरच आरोप करत ASIने स्वत:ला संपवलं; पोलीस दलात खळबळ

Gautam Gambhir: तुमच्या फायद्यासाठी खेळाडूला लक्ष्य करू नका; गौतम गंभीर, हर्षित राणावरून माजी कर्णधार श्रीकांत यांना सुनावले

Latest Marathi News Live Update : पुणे शहरात भाजपमध्ये होणार मोठं इन्कमिंग, मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत होणार सोहळा

SCROLL FOR NEXT